Wednesday, April 17, 2024

Latest Posts

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती संघटनेकडून आरोप

मुंबई पोलीस भरती (Mumbai Police Recruitment) लेखी परीक्षा (Written Exam) ७ मे रोजी मुंबईतील (Mumbai) विविध केंद्रांवर पार पडली. मात्र याच पोलीस भरती प्रक्रियेमध्ये मोठा गैरप्रकार घडल्याचं समोर येत आहे. या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत हायटेक कॉपी (Hi-Tech Copy) करुन शेकडो विद्यार्थी परीक्षेला बसले असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समिती संघटनेने (Competitive Examination Coordinating Committee Organization) केला आहे.

मुंबई पोलीस भरती (Mumbai Police Recruitment) लेखी परीक्षा (Written Exam) ७ मे रोजी मुंबईतील (Mumbai) विविध केंद्रांवर पार पडली. मात्र याच पोलीस भरती प्रक्रियेमध्ये मोठा गैरप्रकार घडल्याचं समोर येत आहे. या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत हायटेक कॉपी (Hi-Tech Copy) करुन शेकडो विद्यार्थी परीक्षेला बसले असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समिती संघटनेने (Competitive Examination Coordinating Committee Organization) केला आहे. या सगळ्या प्रकरणाची मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) गंभीर दखल घेत स्पर्धा परीक्षा समन्वय समिती संघटनेकडे असलेले अधिकचे पुरावे पुढील तपासासाठी मागितले आहेत. परीक्षेच्या दिवशी कॉपी करणाऱ्या काही उमेदवारांविरोधात मुंबई पोलिसांनी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे, गोरेगाव पोलीस ठाणे, मेघवाडी पोलीस ठाणे आणि भांडुप पोलीस ठाण्यात चार स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. उमेदवारांनी कॉपी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा गैरवापर केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते.

७ मे रोजी मुंबई पोलीस भरतीमधील शिपाई पदाच्या ७०७६ जागांसाठी मुंबईत एकूण २१३ केंद्रांवर लेखी परीक्षा झाली होती. एकूण ७८ हजार ५२२ परीक्षार्थी या परीक्षेला उपस्थित होते. तर या परीक्षेकरता एकूण १२४६ पोलीस अधिकारी आणि ५९७५ अंमलदार यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु याच परीक्षे दरम्यान हायटेक कॉपी झाल्याचा आरोप होत आहे.उमेदवारांनी बटन कॅमेऱ्याचा वापर करुन प्रश्नपत्रिकेचे फोटो ई-मेलद्वारे परीक्षा केंद्राबाहेर पाठवले. त्याची उत्तरं अवघ्या काही मिनिटात केंद्राबाहेरील शिक्षकांच्या मदतीने काढून मायक्रोहेडफोनची मदत घेऊन लिहिली, असा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून करण्यात आला आहे. या कॅमेऱ्याद्वारे काढले गेलेल्या प्रश्नपत्रिकांचे फोटो हे प्रसारमाध्यमांच्या हाती लागले आहेत. शिवाय या परीक्षेमध्ये हायटेक कॉपी झाली असून मुंबई पोलिसांनी यासंबंधी तातडीने कारवाई करुन या गैरप्रकारामागे असलेल्या टोळीचा पर्दाफाश करावा, अशी मागणी या संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समिती संघटनेने आरोग्य भरती, म्हाडा आणि टीईटी परीक्षा गैरप्रकार समोर आणून राज्यातील होणाऱ्या परीक्षांचा घोटाळा बाहेर काढला होता.

हे ही वाचा : 

सगळ्यांनी तयार रहा, गाफील राहू नका, असे आदेश – उद्धव ठाकरे

नीराजसिंह राठोड होता तरी कोण ? काय होता भाजपशी संबंध

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss