Friday, June 2, 2023

Latest Posts

एका Instagram पोस्टमुळे अकोल्यातील हिंसा भडकली? कारण आलं समोर

काल दिनांक १३ मे रोजी अकोल्यात रात्रीच्या सुमारास दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही हाणामारी इतकी तुफान होती की दोन्ही गटात जोरदार दगडफेक देखील झाली

काल दिनांक १३ मे रोजी अकोल्यात रात्रीच्या सुमारास दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही हाणामारी इतकी तुफान होती की दोन्ही गटात जोरदार दगडफेक देखील झाली आणि त्यांनतर जाळपोळ करण्यात आली जवळपास १०० बाईकस्वार अचानक रस्त्यावर उतरले. त्यांनी दहशत माजवण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांना या संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. किरकोळ वादातून परिस्थिती इतकी बिघडली की दोन्ही गटांमध्ये राडा झाला.

अकोल्यातील गंगाधर चौक, पोळा चौक, हरिहर पेठमध्ये ही हिंसा भडकली. या हिंसेमुळे सध्या अकोल्यात तणावपूर्ण शांतता आहे. संपूर्ण शहरात रस्त्यावर शुकशुकाट झाला आहे. तर पोलिसांनी फेक बातम्या आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन देखील केलं आहे. तसेच पोलिसांनी फ्लॅग मार्च काढत लोकांना शांत राहण्याचं आवाहन देखील केलं आहे. या हिंसाचारात आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तिची ओळख पटली नाही. अकोल्यातील वाद इतका वाढत गेला की त्यामुळे पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. आता अकोल्यात तणावपूर्ण शांतता आहे. या हिंसाचारात ८ लोक जखमी झाले आहेत. तर १ चा मृत्यू झाला आहे. अकोल्यात चौकाचौकात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

जवळपास १०० बाईकस्वार अचानक रस्त्यावर उतरले. त्यांनी दहशत माजवण्यास सुरुवात केली. त्याची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी येत समाजकंटकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. पण तरीही ते हटण्यास तयार नव्हते. अखेर पोलिसांना लाठीमार करावा लागला. पोलीस जमावाला पांगवत असताना पोलिसांच्या दिशेनेही दगडफेक करण्यात आली. त्यामुळे पोलिसांना या जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार करावा लागला. पोलिसांनी हवेत १२ राऊंड फायरिंग केली.

 

अखेर अकोल्यातील हिंसाचारामागचं नेमकं कारण समोर आलं आहे. इन्स्टाग्रामवर एका समुदायाच्या धर्मगुरू विरोधात अत्यंत घाणेरडी पोस्ट टाकण्यात आली होती. त्याला काही लोकांनी आक्षेप घेतला. पोलिसात जाऊन तक्रारही नोंदवली. मात्र, त्यानंतर अचानक जमाव भडकला. या जमावाने थेट वाहनांची तोडफोड करत जाळपोळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे दुसऱ्या समुदायाचे लोकही रस्त्यावर उतरले. त्यांनीही दगडफेक करण्यास सुरुवात केली. या समाजकंटकांनी पोलिसांच्या वाहनांवरही जोरदार दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. तसेच हवेत गोळीबारही करावा लागला. तसेच सध्या पोलिसांनी अकोल्यात १४४ कलम लागू केलं आहे. तसेच नाक्यानाक्यावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हे ही वाचा : 

कोकण स्पेशिअल चमचमीत फणसाची भाजी माहीत आहे कशी बनवतात? जाणून घ्या आमच्या स्पेशिअल रेसिपी मधून!

न्यू स्टाईलमध्ये बनवा White Sauce Pasta

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

 

Latest Posts

Don't Miss