नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपुरात खुणांच्या घटना घडत आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपुरात दुहेरी हत्याकांड झाल्याची घटना समोर आली आहे. चक्क पोटच्या मुलाने आपल्या आई – वडिलांची हत्या केली आहे. ही हत्या नागपूरच्या कपिल नगर पोलीस ठाण्यांतर्गत खसळा कॅम्पसमध्ये घडली आहे. आरोपीचा नाव उत्कर्ष डाखोडे आहे. तर मृत व्यक्तींचे नाव लीलाधर डाखोडे आणि अरुण डाखोडे अशी आहे. मृतक लीलाधर हे कोराडी थर्मल प्लांटमध्ये तंत्रज्ञ म्हणून काम करत होते तर अरुणा विनोबा भावे नगर येथील एका खाजगी शाळेत प्राथमिक शिक्षिका होती.
आरोपी उत्कर्ष हा ६ वर्षांपासून अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. सतत अपयश आल्याने उत्कर्षच्या पालकांनी अभ्यास सोडून शेती करण्याचा सल्ला देत होते. पण उत्कर्ष अभियांत्रिकी पूर्ण करण्याच्या त्याच्या आग्रहावर ठाम होता. मात्र आरोपी उताकर्षला एमडीचे व्यसन होते आणि या व्यसनामुळे त्याला अभ्यास करता येत नव्हता. आई-वडिलांच्या सततच्या समजुतीमुळे तो चिडला आणि रागाच्या भरात त्याने आपल्या आई-वडिलांची हत्या करण्याचा घातक प्लॅन तयार केला.
पुढे आलेल्या माहितीनुसार, उत्कर्षने फ्लॅन नुसार 26 डिसेंबरला सकाळी आपल्या धाकटी बहीण सेजल हिला कॉलेजला सोडले होते. सेजल बीएमएसचे शिक्षण घेत होती आणि ती वर्धा रोडवर असलेल्या कॉलेजमध्ये जाते. उत्कर्षने बहिणीला कॉलेजला सोडल्यानंतर खासाळ येथील आपल्या घरी पोहोचला, तिथे 1 वाजताच्या सुमारास त्याने आधी आई अरुणाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर आरोपी वडिलांची घरी येण्याची वाट पाहू लागला. 5 वाजताच्या सुमारास वडील त्यांच्या ड्युटीवरून घरी पोहोचल्यानंतर वडिलांवर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. दोन्ही हत्या केल्यानंतर आरोपीने घराला कुलूप लावून वडिलांची गाडी आणि मोबाईल फोन कोराडी येथे राहणाऱ्या मामाकडे नेला आणि तेथून आपल्या बहिणीला फोन करून सांगितले की तो काही दिवसांसाठी ध्यान करायला बंगलोरला जात आहे व बहिणीला काकाकडे सोडून दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्कर्ष मंगळवारी रात्री त्यांच्या घरी आला आणि त्याने जोरात दरवाजा ठोठावण्याचा बहाणा केला. त्यानंतर बुधवारी सकाळी ते पुन्हा कोराडीला काकांकडे झोपायला गेले असता, शेजाऱ्यांना उग्र वास येऊ लागल्याने त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून आत तपासले असता घरभर रक्ताने माखलेले अरुणा व लीलाधर यांचे मृतदेह अखंड अवस्थेत आढळून आले. प्राथमिक तपासादरम्यानच खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यामुळे पोलिसांनी उत्कर्षला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या आई-वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी उत्कर्षला अटक केली असून पोलीस घटनेचा पुढील अधिक तपास करीत आहे.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका