महाराष्ट्रात संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात पाहिले असतानाच कृषी खात्यात झालेला महाघोटाळ्याची चर्चांनी रान उठले आहे. धनंजय मुंडे यांनी कृषिमंत्री असताना त्या खात्यात मोठा घोटाळा केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळात निर्णय झाल्याचं दाखवून त्यांच्या सहीनिशी खोटे आदेश काढले त्यातून सरकारचा निधी घेतला. त्याचा जीआर असा आरोप त्यांनी केला. हा मंत्री कुठल्या थराला जाऊ शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी आणि मंत्रिपदावरून बरखास्त करावं अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.
https://youtu.be/FY20_9Y8u-M?si=jIhur5o6rBuQHxG5
धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळात जो निर्णय झालाच नाही त्याचा आदेश काढून २०० कोटींचा निधी जारी केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला. जो निर्णय झालाच नाही त्याचा खोटा आदेश त्यांनी काढला आणि नंतर अतिरिक्त ५०० कोटींची मागणी केल्याचा आरोपही त्यांनी केला. अशा व्यक्तींना मंत्रीमंडळात राहण्याचा अधिकार नाही, असंही त्या म्हणाल्या.
२३ सप्टेंबर आणि ३० सप्टेंबरच्या कॅबिनेटचे काही निर्णय झाले. पण यात कृषी विभागाशी संबंधित न झालेल्या निर्णयांबाबत धनंजय मुंडेंनी आदेश काढला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत २०० कोटींच्या निधीचा कुठेही उल्लेख नसताना ती रक्कम आजच परत करण्याचे निर्देश धनंजय मुंडे यांनी पात्रातून केले. याशिवाय ऑकटोबरमध्ये अतिरिक्त ५०० कोटींचा निधी देण्याची मागणी केली. धनंजय मुंडेसारखा भ्रष्ट माणूस कृषी काय, कुठलाच मंत्री होण्याच्या लायक नाही, ते अंजली दमानिया म्हणाल्या. तरजोपर्यंत धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळात आहेत तोपर्यंत संतोष देशमुख प्रकरणात अपेक्षित कारवाई होणार नाही असंही दमानिया म्हणाल्या.