बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. राजकारणात देखील मोठ्या घडामोडी घडत आहे. दररोज नवं नवे खुलासे होत आहेत. यामध्ये आता गोट्या गीते हे नाव आता समोर आलं आहे. या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगात आहे. वाल्मिक कराड साठी याच गोट्या गीतेने एक पोस्ट केली आहे. मात्र त्या रिलच्या कॅप्शनने राजकीय नेतेमंडळींचं देखील लक्ष वेधले आहे. ‘अण्णा माझे दैवत, सदैव सोबत’ असं रील त्यानं इन्स्टावर पोस्ट केलं होतं. हे रील व्हायरल झाल्यानं खरंतर या गोट्या गीतेची चर्चा सुरु झाली. आता हा गोट्या गीते नक्की कोण आहे? त्याच्यावर किती आणि कुठले गुन्हे दाखल आहेत? याची माहिती देणारी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तसंच धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या जवळचा तो आहे का? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
वाल्मिक कराड CBI कोठडीत असतानाच त्याचे समर्थक आता सोशल मीडियावर त्याच्या समर्थनार्थ पोस्ट करत असल्याचं समोर आले आहे. बीडच्या गोट्या गीतेने अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यान सध्या अनेकांच लक्ष इथे वळले आहे. अण्णा माझे देवत सदैव सोबत असं एक रील त्याने इन्स्टाग्रामवर टाकले आहे. त्याची ही पोस्ट प्रचंड वायरल झाली आहे. गोटया गीतेवर बीडमध्ये अनेक गुन्हे दाखल असून काही गंभीर गुन्हेही त्याच्यावर दाखल आहेत. पुण्यातही त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.
गोट्या गीते नेमका कोण आहे?
परळी मतदारसंघातील बुथ क्रमांक २०१ मध्ये बोगस मतदान करतानाचा व्हिडिओ विधानसभा निवडणुकीच्या काळात व्हायरल झाला होता. हे बोगस मतदान करतानाची व्यक्ती म्हणजेच गोट्या गीते. मतदान केंद्र ताब्यात घेऊन मतदारांच्या केवळ बोटावर शाई लावून त्यांना बाहेर पाठवायचं आणि गोट्या आपल्याला पाहिजे असलेल्या उमेदवारा समोरचं बटन दाबायचा, हे सर्वकाही पोलिसांच्या देखत घडल्याचं परळीचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी सांगितलं होतं, आव्हाडांनी आपल्या पोस्टमध्ये याचा संदर्भ दिला आहे.
ज्ञानोबा मारुती गीते असं गोट्या गीतेचं खरं नाव आहे. वाल्मिक कराडचा तो राईट हँड असल्याचं सांगितलं जातं. परळीतील नंदागौळ या गावचा तो रहिवासी असून सराईत गुन्हेगार आहे. गेल्या १५ वर्षांपासून त्याच्यावर परळीसह परभणी, लातूर, बीड, पिंपरी-चिंचवड इथं अनेक गुन्हे दाखल आहेत. तो आख्या महाराष्ट्राला बंदुका पुरवत असल्याचं सांगितलं जात आहे. बीडमध्ये अनेकांच्या कमरेला दिसणारी बंदूक या गोट्या गीतेनंच पुरवल्याचंही सांगितले जात आहे.
वाल्मिक कराडसोबत या गोट्या गीतेनं अनेक गुन्हे केले आहेत. त्याच्यावर तब्बल २३ कोर्ट केसेस दाखल असल्याचं कोर्टाच्या वेबसाईटवरुन स्पष्ट होतं.
गोट्यावर नेमके कुठले अन् कुठे गुन्हे दाखल आहेत?
१) देहु येथील तुकाराम महाराज संस्थानातील संत तुकाराम महाराजांच्या मंदिरातील चांदीचा मुखवटा १ मार्च २००८ रोजी चोरी झाला होता. या चोरी प्रकरणातील गोट्या गीते प्रमुख ओरीपी होता.
२) पिंपरी-चिंचवड एका प्रकरणात केलेल्या कारवाईत पिस्तुलं विकणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला होता. यामध्ये १५ पिस्तुलं आणि ८ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. यातही गौट्यावर गुन्हा दाखल होता, काळेवाडी पोलीस स्टेशनमध्ये त्याला ठेवलं होतं.
३) याच वर्षी बीडच्या केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्यात त्याच्यावर हत्या प्रकरणाचा गुन्हा दाखल झाला होता.
४) परळी शहर आणि ग्रामीण भागात चोरी आणि घरफोडीचे अनेक गुन्हे गोट्या गीतेवर दाखल आहेत.
५) परभणी जिल्ह्यामध्ये चोरी, घडफोडीच्या गुन्ह्यांमध्ये त्याला अटक करण्यात येऊन तुरुंगात स्वानगी करण्यात आली होती, तर तुरुगांतून हा गोट्या गीते पळून गेला होता.
६) लातूर जिल्ह्यामध्ये रेणापूर इथं त्याच्यावर चोरी, दरोडा, घरफोडी असे अनेक गुन्हे दाखल आहेत.
७) २०१७ मध्ये त्याला झोपडपट्टी दादा विरोधी कायद्यांतर्गत तडीपारही करण्याता आलं होतं.
हे ही वाचा: