Cotton rate : राज्यात यावर्षी कापसाचे उत्पादन सरासरी समाधानकारक झाले आहे. मात्र कापसाला मिळणारा दर अजूनही समाधानकारक नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली आहे. मात्र काही छोट्या शेतकऱ्यांना पैशांची गरज असल्यामुळे कापूस विकावा लागत आहे. कापसाचे राज्यात अनेक भागामध्ये मोठे उत्पादन आहे. कापसाचे पीक हे अनेक वेळा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरलेले आहे. या कारणामुळे कापसाला पांढरे सोने म्हंटले जाते.
सध्या कापसाची खासगी बाजारपेठेमध्ये आयात वाढली आहे. तसेच ग्रामीण भागात कापूस खरेदीसाठी व्यापाऱ्यांची लगबग दिसून येत आहे. केंद्राचे हमीभाव ७ हजार रुपये इतके आहे. पण, कापसाच्या खाजगी बाजारपेठेमध्ये कापसाचे दर उतरले आहे. खाजगी व्यापारी कापसाला ६७०० ते ७ हजार भाव मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांना कापूस हमी भावापेक्षा कमी दराने विकावा लागत आहे. परंतु आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात कापसाचे दर वाढले आहे. वायदे बाजारात मागील आठवड्यात ७२.३४ सेंट प्रति पौंडवर कापसाचे दर होते. ते आता ७२.६९ सेंट प्रति पौंडवर गेले आहे. या कारणामुळे देशामधील बाजारपेठांमध्ये कापसाचे दर देखील वाढणार आहे.
यंदा कापसाचे नुकसान,जास्त दाराची अपेक्षा : शेतकऱ्यांची अशी अपेक्षा होती की, नैसर्गिक आपत्तीनंतर उरलेल्या कापसाला चांगला भाव मिळेल. बाजारमध्ये दसऱ्यापासून बागायती कापूस दाखल झाला. परंतु परतीच्या पावसाने झोडपल्यामुळे कापसाचे आणखी नुकसान झाले. त्यामुळे शेतामधून येईल तसा कापूस साठवण्याऐवजी थेट बाजारात विक्रीसाठी शेतकरी आणत आहे. याचा फायदा घेत अनेक ठिकाणी व्यापारांकडून दर कमी दिला जात आहे.
कापसाचा भाव हा हमीभाव पेक्षा कमी भाव : २०२४-२५ साठी केंद्र सरकारने कापसाच्या हमीभावात ५०१ रुपयांची वाढ केली आहे. चालू हंगामात मध्यम धाग्याच्या कापसासाठी ७ हजार १२१ रुपये आणि तसेच लांब धाग्याच्या कापसासाठी हमीभाव ७ हजार ५२१ रुपये जाहीर केला आहे. मात्र खासगी व्यापारी हे त्यापेक्षा कमी दर देत आहे. या कारणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
हे ही वाचा:
अजित पवारांकडून बारामती मतदारसंघासाठी जाहीरनामा सादर