चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारताने रविवार २३ फेब्रुवारी २०२५ रोजी पाकिस्तानला पराभूत करून विजय मिळवला. या विजयामुळे देशभरात जल्लोषाचे वातावरण होते. ठीक-ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने विजयाचा उत्सव साजरा केला गेला. दरम्यान, मालवण-आडवण येथील परप्रांतीय मुस्लिम भंगार व्यावसायिकांनी भारत विरोधी घोषणा दिल्या. भारतभर जल्लोष सुरु असताना भारत देशाविरोधात घोषणाबाजी केल्याने वातावरण चिघळले. याचे तीव्र पडसाद सोमवार २४ फेब्रुवारी रोजी दिवसभरात मालवणात उमटले.
मालवणातील सकल हिंदू समाजातर्फे मोटारसायकलद्वारे विराट निषेध मोर्चा काढून संबंधित कुटुंबावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. तर देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी आडवण येथील मुस्लिम भंगार व्यावसायिक पती, पत्नीसह एका अल्पवयीन मुलाविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या परप्रांतीयाकडे स्थानिक आधारकार्ड, पॅन कार्ड, इलेक्शनकार्ड देखील मिळाले आहे. देश विरोधी घटनेची तत्काळ दखल घेत आमदार निलेश राणे यांनी परप्रांतीय भंगारवाल्याच्या वस्तीमधील अनधिकृत बांधकाम हटविण्याचे पत्र मालवण नगरपालिकेला दिले आणि काही तासतच या बांधकामावर बुलडोझर फिरवण्यात आला. यामुळे सदरचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.
मालवणात एक मुसलमान परप्रांतीय भंगार व्यवसायिक यानी काल भारत पाकिस्तान मॅच नंतर भारत विरोधी घोषणा दिल्या. कारवाई म्हणून आम्ही या परप्रांतीय हरामखोराला जिल्ह्यातून हाकलून देणारच पण त्या अगोदर तात्काळ त्याचा भंगार व्यवसाय उध्वस्त करून टाकला. मालवण नगर परिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी ताबडतोब कारवाई केल्याबद्दल त्यांचे आभार. असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.
हे ही वाचा:
फोनवरील व्यक्तीने शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख… Indrajeet Sawant यांना धमकीचा फोन