Army Day 2025 : १ एप्रिल १८९५ ला भारतीय सैन्याची अधिकृतपणे स्थापना झाली. मात्र, १५ जानेवारी १९४९ रोजी भारतीय सैन्याची ब्रिटिशांपासून मुक्तता झाली होती, आणि दुसरं कारण म्हणजे या दिवशी जनरल केएम करियप्पा यांना भारतीय लष्कराचा कमांडर इन चीफ म्हणून घोषित करण्यात आलं होतं. हा दिवस भारताच्या इतिहासातील अभिमानास्पद दिवस आहे. सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांचा या दिवशी सत्कार केला जातो. भारतीय लष्कर आज ७५ व्या सैन्य दिवस (Army Day) साजरा करत आहे. दरवर्षी या दिवशी भारतीय सैन्यात ज्यांनी निस्वार्थ भावनेनं देशाची सेवा केली त्या जवानांना सन्मानित केलं जातं. हा दिवस सेनेच्या सर्व मुख्यालयात साजरा केला जातो.
15 जानेवारीला का साजरा केला जातो आर्मी डे ?
१ एप्रिल १८९५ ला भारतीय सैन्याची अधिकृतपणे स्थापना झाली. मात्र, १५ जानेवारी १९४९ रोजी भारतीय सैन्याची ब्रिटिशांपासून मुक्तता झाली होती, आणि दुसरं कारण म्हणजे या दिवशी जनरल केएम करियप्पा यांना भारतीय लष्कराचा कमांडर इन चीफ म्हणून घोषित करण्यात आलं होतं. 15 जानेवारीला “आर्मी डे” साजरा केला जातो कारण याच दिवशी 1949 मध्ये भारतीय सैन्याचे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ जनरल के.एम. करियप्पा यांनी ब्रिटिश कमांडर-इन-चीफ जनरल फ्रांसिस बुचनन यांच्याकडून भारतीय सैन्याची कमांड घेतली. जनरल करियप्पा हे भारतीय सैन्याचे पहिले भारतीय प्रमुख होते आणि त्यांनी भारतीय सैन्याच्या नेतृत्वाची गादी स्विकारली, ज्यामुळे भारतीय सैन्याच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा ठरला.
लेफ्टनट जनरल के. एम. करिअप्पा
देशाचे पहिले लष्करी लेफ्टनट जनरल के. एम. करिअप्पा होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाचे नेतृत्व लेफ्टनट जनरल के. एम. करिअप्पा यांनी केले. पुढे त्यांचे पद वाढते. १९४९ मध्ये फिल्ड मार्शल करिअप्पा यांची लष्करप्रमुखपदी नियुक्ती झाली. त्यानंतर १९९३ मध्ये वयाच्या ९४ व्य वर्षी त्यांचे निधन झाले. तोपर्यंत करिअप्पा यांच्या नावावर अनेक कर्तृत्वाची नोंद झाली. १९४७ मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध झाले तेव्हा के.एम.करिअप्पा यांनी भारतीय लष्कराचे नेतृत्व केले होते. त्यावेळी त्यांनी दुसऱ्या महायुद्धात सहभागी होऊन बर्मामध्ये जपानिंचा पराभव केल्याबद्दल ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा मानही त्यांना मिळाला.
हे ही वाचा :
मागील ५ वर्षात Best अपघातात किती नागरिक मृत्युमुखी? किती कर्मचारी निलंबित?
गृहमंत्री अमित शहांविषयीचे पवारांचे वक्तव्य राजकीय विद्वेषातूनच