Thursday, November 30, 2023

Latest Posts

मनोज जरांगेंना तातडीनं अटक करा : गुणरत्न सदावर्ते

मनोज जरांवकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड काही अज्ञातांकडून करण्यात आली आहे. तोडफोडीमागे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचं बोललं जात आहे.

मनोज जरांवकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड काही अज्ञातांकडून करण्यात आली आहे. तोडफोडीमागे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात गुणरत्न सदावर्तेंनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी अनेक गंभीर आरोप गुणरत्न सदावर्तेंनी मराठा आंदोलक आणि मनोज जरांगे यांच्यावर केले आहेत. तसेच, मनोज जरांगेंनी तातडीनं अटक करावी, अशी मागणीही यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, “हल्लेखोरांना आणि त्यासोहतच मनोज जरांगेंना मला प्रश्न विचारायचाय. हीच आहे का तुमच्या शांततामय आंदोलनाची व्याख्या? मला सायलेंट केलं जाऊ शकत नाही, मी या भारताचे जे पिलर असतात ५० टक्के जागांचा, ज्या खुल्या वर्गासाठी जागा असतात, त्या वाचवण्यासाठी माझा लढा आहे. या देशाला जातीत जातीत न तोललं जावं, तर गुणवत्तेत तोललं जावं, यासाठी माझा लढा आहे. माझ्या कष्टाचे आणि घामाचे नुकसान तुम्ही केलं. यापूर्वी 32 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण तुम्ही केली. त्यासंबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारण नसताना कारवाई करण्यात आली. तेव्हापासूनच मला अनेक प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत.

“गेंना तातडीनं अटक करा – गुणरत्न सदावर्तेंचा सरकारला इशारा केला आहे.

नेण्यापर्यंत मला धमक्या येत आहेत. अशा प्रकारचे हल्ले, असा आघात होईल, आम्हाला त्रास दिला जाईल, फोन, व्हिडीओ रेकॉर्डिंग, सोशल मीडियावरच्या धमक्या आम्हाला दिल्या जात आहे.” , असंही गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं आहे.

पोलिसांनी याबाबत माहिती होती : गुणरत्न सदावर्ते

“काही दिवसांपूर्वी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी माझ्यासमोरच पोलीस आयुक्तांना फोन केला होता. त्यानंतर एका कॅबिनेट मिनिस्टरनंही यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. याचाच अर्थ पोलिसांनाही याबाबत माहिती होते. आज ज्यांनी माझ्या गाडीची तोडफोड केली. ते इमारतीतील माझ्या घरी येण्याचाही प्रयत्न करत होते.”, असं सदावर्ते म्हणाले आहेत.

मनोज जरांगेंना तातडीनं अटक करा : गुणरत्न सदावर्ते
“जरांगे तुम्हाला मी सांगतो, देवेंद्र फडणवीसांनाही सांगतो, महाराष्ट्रात अशा अघटीत घटनांची श्रृंखला पोलिसांवरील हल्ल्यापासून झाली. ती आज माझ्या घरात येऊन ठेपली. मला हे सांगायचं आहे की, बस्स झालं, ज्या माणसामुळे पोलीस धारातीर्थी पडले, अशा या जरांगेला तातडीनं अटक करा, मुसक्या बांधा, कारवाई करा अन्यथा सर्व गुणवंतांना वाटेल की, अशा प्रकारे जात म्हणून एकत्र आलं तर गुणवंता तोडमोड केली जाऊ शकते”, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

जरांगेचे लाड थांबवले नाहीत, तर… : गुणरत्न सदावर्ते

“मी थांबणार नाही, या क्षणानंतर मीसुद्धा राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये जाऊन खुल्या गुणवंत विद्यार्थ्यांशी चर्चा करेल आणि मी सरकारला सांगेल, एकट्या जरांगेचं ऐकायचं नाही, आमचंही ऐकायचं आणि जरांगेंचे लाड थांबवले नाही, तर मी या क्षणापासून प्राणांतिक उपोषण करेल”, असंही सदावर्ते म्हणाले आहेत.

नेमकं काय घडलं?

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची काही लोकांकडून तोडफोड करण्यात आली आहे. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्तींनी वकील गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड केली. सदावर्तेंच्या परळ येथील घराबाहेर त्यांची गाडी उभी होती. तिथेच त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतलं आहे. सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करणारे तिनही तरुण संभाजीनगरचे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे .

हे ही वाचा : 

Gaza साठी भारत बनला देवदूत, ३८ टन अन्नासह वैद्यकीय उपकरणे…

दसऱ्यानिमित्त Rakhi Sawant चा रावण लूक होतोय व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss