बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरण करून खून करण्यात आला. अनेक नेते देशमुखांच्या कुटुंबियांना भेट देऊन संतत्वन देत आहे. विरोधी पक्षाकडून संसदेत आणि राज्याच्या विधीमंडळात देखील आवाज उठवण्यात आलाय. देशमुख यांच्या हत्येला जबाबदारी असणाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही आरोपीला सोडणार नाही, असा शब्द दिला होता. मात्र, अजूनही या प्रकरणातील बरेचशे आरोपी फरार आहेत. पण या बीड जिल्ह्यात फक्त १० महिन्यात ३६ खून झाल्याची नोंद आहे.
जानेवारी ते ऑक्टोबर २०२४ या गेल्या १० महिन्यांच्या कालावधीत बीड जिल्ह्यात ३६ खून झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे. यामध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्यासह मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा समावेश आहे. खून करण्याचा प्रयत्न केल्याचाही १६८ घटनाही घडल्या आहेत.
तर १६५ अत्याचाराच्या घटना बीड मध्ये घडल्या आहेत
गर्दी करून मारामारी करणे, दंगल घडवणे यासारखे 498 गुन्हे 10 महिन्यांत दाखल आहेत. यातील 7 गुन्हे अजूनही उघड झालेले नाहीत.याशिवाय 156 अत्याचाराच्या 386 विनयभंग झाल्याच्या घटना देखील या कालावधीत समोर आल्या आहेत. बीड जिल्ह्यात महिला, मुली देखील सुरक्षित नाहीत.
१० महिन्यात ३६ खून झाल्याचे नोंद आहे. यात परळीतील सरपंचाच्या खुनाचाही समावेश आहे. यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्याचाही समावेश होता. याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. याला अनेक महिन्यांचा कालावधी उलटला तरी हा नेता अद्यापही एलसीबी आणि स्थानिक पोलिसांना सापडलेला नाही.
बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांमध्ये दोन सरपंचाच्या हत्या झाल्या आहेत. या हत्येने बीड जिल्हा हादरला. मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांची हत्या झाली. या हत्येने बीड जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली. आता मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिला हादरलाय. अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र अजूनही या प्रकरणातील बरेचशे आरोपी फरार आहेत. या घटनेत धनंजय मुंडेंचे जवळचे वाल्मिक कराडचा समावेश असल्याचा समोर आला आहे.
हे ही वाचा:
Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?
लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.