Thursday, April 25, 2024

Latest Posts

Trimbakeshwer मंदिरात जमावाकडून बळजबरीनं घुसण्याचा प्रयत्न

सध्या राज्यात अनेक घटना घडत असल्याचं चित्र हे दिसून येत आहे. नुकतीच अकोला आणि अहमदनगरच्या (Ahmednagar) शेवगाव मध्ये घटना घडल्या आहेत.

सध्या राज्यात अनेक घटना घडत असल्याचं चित्र हे दिसून येत आहे. नुकतीच अकोला आणि अहमदनगरच्या (Ahmednagar) शेवगाव मध्ये घटना घडल्या आहेत. अकोला शहरातील जुने शहर भागातल्या हरिहरपेठमध्ये दोन गटांमध्ये मोठा वाद झाल्याची घटना घडली. त्यांनतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाल्याचा प्रकार घडला. हे वाद शमत नाही तोच त्र्यंबकेश्वर येथील (Trimbakeshwer) मंदिरात प्रवेश करण्यावरून वाद निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे.

त्र्यंबकेश्वरमधील एक वादाचा प्रकार हा समोर आला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात काही लोकांनी जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावरून संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण हे निर्माण झाल्याचे समजते आहे. मात्र पोलिसांच्या आणि मंदिर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला असला तरी मंदिर प्रशासनाकडून या घटनेच्या चौकशीसाठी पोलिसांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. दिनांक १३ मे रोजी ही घटना घडली आहे. मंदिर प्रशासनाच्या सुरक्षा रक्षकांनी वाद घालणाऱ्या जमावाला रोखले.

त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग (Trimbakeshwer Jotirlinga) मंदिर हे सायंकाळी ९ वाजता बंद करण्यात येते. उत्तर दरवाजाच्या ठिकाणी अचानक एक जमाव आलेला होता. यावेळी त्यांनी मंदिरात प्रवेश करण्याची मागणी केलेली होती. परंतु त्यांना प्रवेश हा नाकारण्यात आला. त्यामुळे एका बाजूने मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठीचा हट्ट आणि दुसरीकडनं सुरक्षा रक्षकांकडून त्यांना केला जाणारा मज्जाव, त्यामुळे हा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर देवस्थानला माहिती मिळाल्यांनतर देवस्थानचे इतर व्यक्ती तिथे आलेले होते आणि त्यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना देखील पाचारण करण्यात आलेले होते, परंतु त्यानंतर हा वाद मिटलेला होता. मात्र पुन्हा देवस्थांनकडून पोलिसांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

हे ही वाचा : 

मविआ ची ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा एकदा सुरू करणार, जयंत पाटील

Sharad Pawar यांनी बोलावली मविआ ची महत्वाची बैठक, जागा वाटपावर चर्चा होणार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss