Thursday, April 25, 2024

Latest Posts

मंत्रिपदाचं आमिष दाखवून आमदारांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न उघडकीस

गेल्या काही दिवसांत आरोपीनं काही भाजप (BJP) आमदारांना फोन केले होते आणि आपण नड्डांच्या जवळचे आहोत, असं सांगत मोठी रक्कम उकळण्याचा त्याचा प्रयत्न देखील केला होता. काही आमदारांनी या भामट्याच्या दाव्यांना सत्य मानून त्याला लाखोंची रक्कम दिल्याचीही माहिती समोर येत आहे.

गेल्या काही दिवसांत आरोपीनं काही भाजप (BJP) आमदारांना फोन केले होते आणि आपण नड्डांच्या जवळचे आहोत, असं सांगत मोठी रक्कम उकळण्याचा त्याचा प्रयत्न देखील केला होता. काही आमदारांनी या भामट्याच्या दाव्यांना सत्य मानून त्याला लाखोंची रक्कम दिल्याचीही माहिती समोर येत आहे. मात्र या गोष्टीला अद्याप पोलिसांकडून दुजोरा मिळू शकलेला नाही. यासंबंधीपोलिसांकडून अधिक तपस करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सुद्धा काही आमदारांना मंत्रिपदाचं आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. नीरज सिंह राठोड असं या आरोपीचं नाव आहे. त्याला गुजरातच्या मोरबीमधून अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, पैसे उकळण्यासाठी तो भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा (BJP President J. P.Nadda) यांच्या नावाचा गैरवापर करत होता.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होईल हे जरी स्पष्ट नसलं, तरी राज्यातील काही आमदारांना मंत्रिपद मिळवून देतो, असं आमिष दाखवत त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, आमदारांना मंत्रीपद मिळवून देण्याचा आमिष दाखवणारा भामटा हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं नाव घेऊन त्यांना फोन करून आमदरांची फसवणूक करत असल्याचं समोर आलं आहे. नागपूर पोलिसांनी या भामट्याला गुजरातमधील मोरबीमधून १६ मे रोजी या रात्री उशिरा ताब्यात घेतलं असून त्याचं नाव नीरज सिंह राठोड आहे हे माहितीच्या आधारे समोर आले आहे. नीरज सिंग राठोड याने गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील काही भाजप आमदारांना संपर्क साधून तो भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या जवळचा असल्याची बतावणी केली आणि महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी मिळवून देतो, असं सांगून कोट्यवधी रुपयांची मागणीही केली.
नीरज सिंह राठोडनं संपर्क केलेल्या आमदारांमध्ये दोन आमदार नागपूर जिल्ह्यातील असून इतर आमदार मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील असल्याची माहिती आहे. काही आमदारांनी या भामट्याच्या दाव्यांना सत्य मानून त्याला लाखोंची रक्कम दिल्याची ही माहिती आहे. मात्र या गोष्टीला अद्याप पोलिसांकडून दुजोरा मिळू शकलेला नाही. दरम्यान, नागपूरमध्ये भाजप आमदार विकास कुंभारे यांनाही या भामट्यानं सात मे रोजी संपर्क साधून मंत्रिपद मिळवून देतो अशी बतावणी केली होती. त्यानंतर विकास कुंभारे यांनी त्यासंदर्भातील माहिती गोळा केली आणि नीरज सिंह राठोड नावाची कुठलीही व्यक्ती जेपी नड्डा यांच्या जवळची नाही हे स्पष्ट झाल्यानंतर विकास कुंभारे यांनी त्यांच्या स्वीय सहायकाच्या माध्यमातून नागपूर पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे. नागपूर पोलिसांनी नीरज सिंह राठोड विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करत त्याला गुजरातमधील मोरबीमधून अटक केली आहे, प्रसारमाध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नीरज सिंह राठोड याने गोवा आणि नागालँडमधील काही भाजप आमदारांनाही अशाच पद्धतीची बतावणी करून त्यांची फसवणूक केली आहे.
त्यामुळे भाजप नेत्यांच्या फसवणुकीचं हे प्रकरण आंतरराज्य स्वरूपाचं झालं आहे.

हे ही वाचा : 

त्र्यंबकेश्वरमधील घटनेवर संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया, काहीही चुकीचं घडलेलं नाही…

अन्यायावर आवाज उठविणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रेमापोटी ‘TDM’ येतोय ९ जून २०२३ रोजी भेटीला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss