spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

अन्नदाता शेतकऱ्यांना भिकारी म्हणणाऱ्या माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेण्याची Atul Londhe यांची मागणी

भाजपा युती सरकारमधील मंत्र्यांचा शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन चांगला नाही. शेतकऱ्यांना भिकारी म्हणून अपमान करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदावर बसण्याचा अधिकार नाही. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा घेऊन घरी पाठवावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

https://youtu.be/jaK3W7-qXuA?si=UmN8cMMAffH8dsN5

“हल्ली भिकारीही एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांत पीकविमा दिला”, या कृषीमंत्री माणिकराव कोकोटे यांच्या वक्तव्यावर अतुल लोंढे यांनी तीव्र आक्षेप घेत माणिकराव कोकाटे व भाजपा युती सरकारवर तोफ डागली. शेतकरी अन्नदाता आहे, देशाचा मालक आहे, तो घाम गाळून पिकवतो म्हणून आपल्या ताटात अन्न येते, स्वतः उपाशी राहून तो लोकांचे पोट भरतो. त्या शेतकऱ्यांना भिकारी म्हणण्याची हिम्मत कशी होते?

पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झाला आहे, पण भ्रष्टाचार होतच असतात, असेही कृषी मंत्री कोकाटे म्हणत आहेत. सरकारमधील लोकांना काही लाजलज्जा आहे का? कसले लोक मंत्रिमंडळात घेतले आहेत? असा प्रश्न विचारत अजित पवार यांनी या प्रकरणी लक्ष घालावे, असे अतुल लोंढे म्हणाले.

-किशोर आपटे 

हे ही वाचा:

‘दैनंदिन वापरात इंधन बचत केल्यास शाश्वत विकास शक्य’ Aditi Tatkare यांचा विश्वास

गाव सोडून शहराकडे वळणाऱ्या सगळ्यांसाठी ‘गाव बोलावतो’, टिजर रिलीज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss