बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी ८ आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आता वाल्मिक कराडने आवादा कंपनीकडे एक वेळा नाही तर तब्बल सहा वेळा खंडणी मागितल्याचे समोर आले आहे. आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांच्या जबाबात त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच सुदर्शन घुलेने संतोष देशमुख यांना तुला बघून घेईल, जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. असेही आता तपासात पुढे आले आहे. कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांचा जबाब आता समोर आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, वाल्मिक कराडने पहिल्यांदा फोनवरून खंडणी 28/8/2024 रोजी मागीतली होती. यावेळी तुम्ही परळीत येवून भेटा नाही, तर काम बंद करा,असे म्हटलंय. तर दुसऱ्यांदा वाल्मिक कराडने फोनवरून खंडणी ही 11/09/2024 मागितली. यावेळी तुमचे बीड जिल्ह्यात कुठे कुठे काम चालू आहे? याची मला माहिती आहे. तुमच्या वरिष्ठांना माझ्याकडे घेऊन या. असे वाल्मिक कराड फोनवरून म्हणाला. तिसऱ्यांदा खंडणी 08/10/2024 परळी येथे वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि माझे सहकारी शिवाजी थोपटे यांची परळीतील जगमित्र कार्यालयात भेट झाली होती. प्लांट सुरू ठेवायचा असेल तर दोन कोटी रुपये द्या. नाहीतर जिल्ह्यात कुठेही प्लांट सुरू ठेवू देणार नाही. अशी धमकी दिली होती.
दरम्यान, चौथ्यांदा खंडणी 26/11/2024 सुदर्शन घुले कंपनीत येवून वाल्मिक अण्णांनी सांगितलेले दोन कोटी रुपये दिले नाही तर बीड जिल्ह्यात कुठेही काम करू देणार नाही, असे म्हणत धमकी दिली. तर पाचव्यांदा खंडणी 29/11/2024 रोजी विष्णू चाटेला 11:30 च्या सुमारास कॉल केला. त्यावेळी वाल्मीक अण्णा बोलणार आहेत असे सांगून कराड म्हणाले, अरे ते काम बंद करा, चालू ठेवलं तर वातावरण गढूळ होऊन बसल. ज्या परिस्थितीत सुदर्शनला सांगितले आहे. त्या परिस्थितीत काम बंद करा आणि तुम्ही पण तिथून निघून जा. काम चालू कराल तर याद राखा. असे ते म्हणाले. तर 29 /11/2024 रोजी दुपारी एक वाजता सुदर्शन घुले मस्साजोग येथे कंपनी ऑफिसमध्ये आला होता. वाल्मीक अण्णांनी ठेवलेली डिमांड तुम्ही लवकर पूर्ण करा. अण्णा आज केजमध्ये येणार आहेत. त्यावेळी त्यांची भेट घ्या. असे धमकावून ऑफिसमधून निघून गेला. तर सहाव्यांदा खंडणी मागताना 06/12/2024 रोजी सुदर्शन घुले कंपनी ऑफिसमध्ये आला.
सुरक्षारक्षकाला शिव्यागाळ करून मारहाण केली. थोपटे यांना दोन कोटी रुपये खंडणी द्या, नाहीतर कंपनी बंद करा. अशा शब्दात धमकी दिली. यावेळी संतोष देशमुख यांनी कंपनी बंद करू नका, असे येऊन सांगितले त्यावेळी तुला बघून घेतो. तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. असं शिवाजी थोपटे यांनी सुनील शिंदे यांना सांगितलं होतं.
पहिली खंडणी – 28/8/2024
दुसरी खंडणी – 11/09/2024
तिसरी खंडणी – 08/10/2024
चौथी खंडणी – 26/11/2024
पाचवी खंडणी – 29/11/2024
सहावी खंडणी – 29 /11/2024
हे ही वाचा :
Maharashtra Budget 2025: यंदाच्या अर्थसंकल्पाने बळीराजाला काय काय दिले?
Follow Us