spot_img
spot_img

Latest Posts

जळगावातील वक्तव्यानंतर बच्चू कडू यांनी मागितली माफी

१७ सप्टेंबर रोजी आमदार आमदार बच्चू कडू जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यावर असताना प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

१७ सप्टेंबर रोजी आमदार आमदार बच्चू कडू जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यावर असताना प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. “मी आमदार होणार नाही याची पर्वा नाही. मात्र शेतकऱ्यांची पर्वा असणारा प्रहार हा पक्ष आहे,” असं आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले होते. त्यावर त्यांना त्यांची चूक लक्षात येताच माफी मागून विषय टाळण्याचा प्रयत्न केला.

“आज-काल हिजडे सुद्धा आमदार होतात,” असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी जळगावमधील (Jalgaon) प्रहार जनशक्ती पक्षाच्या (Prahar Janshakti Party) वतीने आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात केलं होतं. “आपल्याला आज-काल आंडू पांडू लोकही आमदार होतात असं आपल्याला म्हणायचं होतं,” अशी सारवासारव बच्चू कडू यांनी केली. “ज्याच्या बोलण्यात दम नसतो, ज्याच्या ओठावर मिशी नसते, चालतो तेव्हा बाई आहे की माणूस ते सुद्धा कळत नाही, असे लोकही आमदार होतात. हिजडे सुद्धा आमदार होतात.” असे विधान आमदार बच्चू कडू यांनी केले होते.मात्र मेळाव्यानंतर त्यांना त्यांची चूक लक्षात आली. बच्चू कडू यांनी भाषणात वापरलेल्या शब्दाबद्दल माफी मागितली आणि विषय टाळण्याचा प्रयत्न केला. आंडू-पांडू लोकही आमदार होतात असा माझा म्हणण्याचा उद्देश होता, असं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.

जळगावात सुरु असलेल्या रॅली दरम्यान एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत ही रॅली काढण्यात आली होती. या घडलेल्या घटनेचा बच्चू कडू यांनी चांगलाच समाचार घेतला. कॉलेज आणि शाळांमधील मुलांचा वापर पक्षाच्या कामासाठी होता कामा नये. एखादी संस्था असं करत असेल तर अशा संस्था बंद केल्या पाहिजेत, अशा पद्धतीचा प्रकार प्रहार जनशक्ती खपवून घेणार नाही, संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.

हे ही वाचा: 

नांदेडमध्ये मराठा आंदोलनात सहभागी असलेल्या युवकाने केली आत्महत्या

आज होणार शिवसेनेच्या दोन मोठ्या याचिकांवर निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss