spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

वांद्रा आत्ता असुरक्षित ठिकाण झालं आहे; महापालिका निवडणुका आम्ही स्वबळावर लढण्यास समर्थ- झिशान सिद्दीकी

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला झाला. एका अज्ञात व्यक्तीने वांद्र्यातील घरात घुसत हा प्राणघातक हल्ला केला. आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याची माहिती आहे. संशयित आरोपीची ओळख पटल्याचं समोर आलं आहे. मुंबई पोलिसांनी विविध पथके नेमली आहे. या प्रकरणाच्या तपासाची चक्र अधिक गतिमान केली आहे. सध्या राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही आहे. त्यामुळे अशा घटना घडत आहेत. त्यावर सरकारने गांभीर्य दाखवावं, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते झिशान सिद्दीकी यांनी दिली.

 

नेमकं काय म्हणाले झिशान सिद्दीकी ?

वांद्रा आत्ता असुरक्षित ठिकाण झालं आहे. आम्ही वांद्र्यात लहानपणापासून राहत आहोत. पण आम्हाला असं असुरक्षितता वाटली नाही. पण आताच्या घटना बघता आम्हाला इथे असुरक्षित वाटत आहे. या संदर्भात गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी, असं झिशान सिद्दीकी यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आज शिर्डीत शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला झिशान सिद्दीकी देखील उपस्थित आहेत. यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

काही बिल्डरांची नाव मी पोलिसांना माझ्या जबाबात दिली

मी माझ कुटुंब एका दुर्दैवी घटनेतून गेलो आहे. त्यामुळे या घटनेच्या संदर्भात मी पोलिसांना स्टेटमेट दिलं आहे. काही बिल्डरांची नाव मी पोलिसांना माझ्या जबाबात दिली आहे. त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे, पण तसं होताना काही दिसत नाही. यासंदर्भात मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीसुद्धा भेट घेणार आहे. देवेंद्र फडणवीस वेळ देतील ही अपेक्षा आहे. 2 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुद्धा भेट घेतली, अशी माहिती झिशान सिद्दीकी यांनी दिली.

महापालिका निवडणुका आम्ही स्वबळावर लढण्यास समर्थ

शिर्डीत येऊन खूप छान वाटतंय. मला बोलण्याची संधी मिळाली. महायुतीमध्ये कोण कट्टरतावाद करत असेल तर त्याचं ते व्यक्तिगत मत असेल. त्याला महायुती समर्थन करत नाही. जेव्हा कधी महायुतीची बैठक होईल. त्या बैठकीत मी या कट्टरतावादाची भूमिका मांडेन. महापालिका निवडणुका आम्ही स्वबळावर लढण्यास समर्थ आहोत. 227 वॉर्ड आम्ही स्वबळावर लढायला तयार आहोत, असंही झिशान सिद्दीकी यांनी यावेळी सांगितले.

Latest Posts

Don't Miss