spot_img
Thursday, December 5, 2024
spot_img

Latest Posts

गावात चक्क खासदाराला गावबंदी; सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक

माझ्या सर्वत्र विधानसभा निवडणुका या पार पडल्या. २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचा निकाल आपल्या सर्वांच्या समोर आला आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीने (Mahayuti) मोठी मुसंडी मारली तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला.

माझ्या सर्वत्र विधानसभा निवडणुका या पार पडल्या. २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचा निकाल आपल्या सर्वांच्या समोर आला आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीने (Mahayuti) मोठी मुसंडी मारली तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला. काही ठिकाणांच्या निकालावरून अजूनही त्या त्या विधानसभेत वादविवाद हे सुरू आहेत. अनेक ठिकाणी निकालांचे मंथन गल्ली- गल्लीत, चौका – चौकातून सुरू आहे. काहींना दुसऱ्या उमेदवाराचा विजय तर काहींना आपल्या उमेदवाराचा पराभव हा मोठ्या प्रमाणात जिव्हारी लागला आहे. निवडणुका संपल्या निकाल समोर आले तरीही मात्र गावातील वाद-विवाद काही थांबायचे नाव घेत नाहीत. असाच एक वादविवाद सध्या चांगला चर्चेत आला आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे तर खासदारालाच गावबंदी करण्यात आली. यासंबंधीचे पोस्टरच गावात झळकल्याने त्याची चर्चा राज्यभरात सुरू झाली आहे. नेमका काय आहे हा प्रकार?

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर विधानसभा मतदारसंघात (Sinnar Assembly Constituency) काय होते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. सिन्नर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे उदय सांगळे (Uday Sangle) विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यात मोठी लढत चालू होती.आणि यामध्ये माणिकराव कोकाटे यांचा विजय झाला आहे. परंतु या विजयानंतर आता जिल्ह्यात अनेक वाद हे सुरु झाला आहेत. या निवडणुकीत माणिकराव कोकाटे यांनी उदय सांगळे यांचा पराभव केला. सिन्नर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार उदय सांगळे पराभूत झाल्यानं ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या विरोधात फलकबाजी करण्यात आली आहे. यामुळे महाविकास आघाडीतील धुसफूस बाहेर आली आहे.

सिन्नर विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे खासदार आणि अजित पवार गटाचे नवनिर्वाचित आमदार माणिकराव कोकाटे यांचा फोटो असणारा बॅनर झळकल्याने संभ्रम निर्माण झालाय. महाविकास आघाडीत असताना महायुतीकडून काम केल्याचा आरोप करत त्यांना गावबंदी घालण्यात आल्याचे समोर येत आहे. द्धव ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे आणि त्यांच्या कुटुंबियांना थेट गावबंदी करण्यात आली. त्यांच्यासह कुटुंबियांना गावात प्रवेश देण्यास मनाई आहे, असा फलक झळकला. महाविकास आघाडीत संशयाचं वातावरण निर्माण झाल्यानंतर अज्ञातांकडून गावबंदीचा फलक लावण्यात आला होता. मात्र ग्रामपंचायतीने एकोपा टिकविण्यासाठी तातडीने फलक हटवून फलक लावणाऱ्या अज्ञातांचा निषेध व्यक्त केला आहे.

खासदार राजाभाऊ वाजे यांना त्यांच्याच गावात गाव बंदी घातल्याचे समोर आले आहे. गद्दार खासदार पराग वाजे असा गाव बंदी बॅनरवर उल्लेख दिसत आहे. राजाभाऊ वाजे यांना त्यांच्या गावासह तीन ते चार गावांमध्ये गावबंदी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. खासदार राजाभाऊ वाजे आणि त्यांच्या कुटुंबियांना सिन्नर तालुक्यात ही गावबंदी करण्यात आली आहे. महायुतीचे उमेदवार माणिकराव कोकाटे त्यांच्या बॅनरवर राजाभाऊ वाजे यांचे फोटो झळकल्याने हा वाद ओढवल्याची चर्चा होत आहे. महाविकास आघाडीत असताना महायुतीकडून काम केल्याचा आरोप करत त्यांना गावबंदी घालण्यात आल्याचे समोर येत आहे.

हे ही वाचा:

Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?

लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss