spot_img
Sunday, February 9, 2025

Latest Posts

पानिपत युद्ध: मराठ्यांचे शौर्य आणि पराभव

पानिपत हे नाव जरी आलं सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभी राहते ती अहमदशाह अब्दाली आणि मराठे यांच्यात झालेली लढाई . उत्तर भारतात आपले पाय रोवायचे या हेतूने पेशव्यांनी दिल्लीकडे कूच केली पुढे हरियाणात जाताना पानीपतला लढाई झाली . गारठत्या थंडीत मराठा सैन्यानी शत्रूंशी झुंज दिली खरी पण सदाशिवभाऊ पेशव्यांच्या पुढे यांच्या पुढं जाण्याचा निर्णयांन घनघोर लढाई झाली मात्र मराठ्याना यात यश मिळवता आलं नाही . जवळपास लाखभर सैन्य रणात पडल आणि पराभव स्वीकारावा लागला . अटकेपार झेंडा रोवणारे मराठे पहिल्यांदा रणात पराभूत झाले

 

पानिपतच्या लढाईची सुरुवात झाली ती म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याला वारस मिळाला नाही ही संधी शोधून मराठ्यांनी उत्तरेत आपल्या सत्तेचा विस्तार करायच ठरवलं आणि उत्तरेकडे पाय रोवायला सुरुवात केली . उत्तरेत थंडी खूप असते त्यामुळ आपले सैन्य थंडीत तग धरू शकले नाहीत निकराची लढाई झाली मात्र थंडीने गारठलेल्या सैन्यांनी निकराची झुंज दिली .

उत्तरेत गेल्यावर पेशव्यांनी १७६० ला कुंजपुरा जिंकल आणि पुढे जाऊन कुरनाल , कुरुक्षेत्र , पानिपत या ठिकाणी सैन्य स्थिरावल ,ज्यावेळी १७६० ला कुंजपुरा जिंकल त्याचवेली पुढे चाल करून अपेक्षित होत मात्र दोन महिने सैन्य त्याच ठिकाणी राहिले त्याच कालावधीत अब्दालीने यमुनेच्या पलिकडे युध्दच नियोजन करत होता . अब्दालीच्या हल्ल्याची कल्पना पेशव्यांना आली नाही . कारण अब्दालीकडे असलेलं गुप्तहेर , यंत्रणा , रसद सगळं काही सैन्यात होत . अब्दाली उत्तरेकडून आल्याने त्यांच्या सैन्याकडे सगळी व्यवस्था होती मात्र १७६० ऐवजी लढाई ही १७६१ ला झाली आमि त्याच फटका सहन करावा लागला कारण जानेवारी महिन्यात उत्तर भारतात प्रचंड थंडी असते त्यात लढाई करताना अडचणी आल्या आणि एक लाख सैन्य लढाईत मारल गेल ,

पानिपतच्या लढाईविषयी इतिहासकारांमध्ये मतमतांतर आहेत मात्र पानीपतमध्ये सदाशिवराव पेशव्याना हार पत्करावी लागली .सैन्य निकराने रणात लढले मात्र युद्ध मैदानावर पराभव झाला .

पानिपत युद्ध हे फक्त लढाई नाही तर मराठ्यांचं शौर्य दाखवणारी घटना आहे . कमी सैन्य असताना पण मराठे निकराने लढले मात्र उत्तरेत मराठ्यांनी धडक मारली हे ही नसे थोडके , पानिपत युद्धबे अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे . मराठे रडले नाहीत तर लढले हा इतिहास आजही पानिपत जगायला शिकवतो. आपल्याकडच्या अनेक मराठा सैन्यांनी तिकडेच आपली घर प्रस्थापित केली आहेत . ते आज एकत्र येवून मराठ्यांच्या शौर्याची आठवण करतात . १४ जानेवारी १७६१ चा दिवस हा मराठ्यांच्या इतिहासात काळा दिवस ठरला मात्र मराठ्यांनी निकराची झुंज दिली याची दखल इतिहासाने घेतली . मर कर भी जो ना हटे ओ मराठा अशी आख्यायिका पानिपत युद्धाने रुढ केली .

पानिपतच्या युद्धाची अनेक कारण सांगितली जात मात्र इतिहासातून चुका नाही तर प्रेरणा घ्यायची असते . आजही पानीपतची माती मराठ्यांच्या शौर्याची पराक्रमाची साक्ष देतो . हरयाणातल्या पानीपटीत आजही मराठ्यांची शौर्य गाथा पाह्याला मिळते .

Latest Posts

Don't Miss