Latur 4200 Chicks Found Dead : राज्यात बर्ड फ्लूने डोकं वर काढलं आहे. काही वर्षांपूर्वी बर्ड फ्लूमुळे खवय्यांचे चांगलेच वांधे झाले होते. तर कुक्कुटपालन व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला होता. आता ही राज्यातील लातूरसह ठाणे आणि इतर जिल्ह्यात पोल्ट्री फार्म चालक आणि मालकांची चिंता वाढली आहे. तर अनेक हॉटेल्सवर आतापासूनच चिकन नको, अशी आरोळी ग्राहक ठोकत आहेत.
महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील एका पोल्ट्री फार्ममध्ये सुमारे ४,२०० पिल्ले मृतावस्थेत आढळून आली आहेत. एका अधिकाऱ्याने गुरुवारी (२३ जानेवारी) ही माहिती दिली. याआधी काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात सुमारे ६० कावळे बर्ड फ्लूने दगावले होते. अधिकाऱ्याने सांगितले की, अहमदपूर तहसीलच्या ढालेगाव येथे 5 ते ६ दिवसांची पिल्ले मरण पावली असून बुधवारी मृतदेहाचे नमुने औंध, पुणे येथील राज्य पशू रोग निदान प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली असल्याचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.श्रीधर शिंदे यांनी सांगितले. अधिका-यांनी सांगितले की, पिल्ले दोन-तीन दिवसांत मरण पावली आणि ‘पोल्ट्री फार्म’च्या मालकाने या संदर्भात ताबडतोब अधिकाऱ्यांना माहिती दिली नाही, ज्यामुळे संसर्ग पसरला आणि 4,500 पैकी 4,200 पिल्ले मरण पावली.
अहमदपूर पशुवैद्यकीय रुग्णालयाचे उपायुक्त डॉ.शिवाजी क्षीरसागर यांनी पोल्ट्री फार्मच्या मालकांनी आपल्या केंद्रांची नोंदणी करून स्थानिक अधिकाऱ्यांना अशा घटनांची माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यातील उदगीर शहरात सुमारे ६० कावळे मृतावस्थेत आढळले होते. पुणेस्थित प्रादेशिक रोग निदान प्रयोगशाळा आणि आयसीएआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीज, भोपाळ यांनी केलेल्या चाचण्यांमध्ये या मृत्यूंचे कारण बर्ड फ्लू असल्याची पुष्टी झाली.
हे ही वाचा :