spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

बीड जिल्यात १८३ शस्त्र परवानगी रद्द, शस्त्र परवाना असणाऱ्यांच्या घरी पोलिसांच्या चकरा

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर दहशत, सत्ता, पैसा आणि बीडच्या वाळू माफिया आणि राखेचं भयानक वास्तव समोर आलं. हे वास्तव समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. पवनचक्की प्रकरणाप्रमाणेच बीडमध्ये बंदुकीचा धाक दाखवणाऱ्यांच्या संख्येत कमी नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी हवेत गोळीबार करणाऱ्यांच्या वायरल व्हिडीओने मोठी खळबळ माजली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर प्रशासन सतर्क झाला आहे. बीड जिल्ह्यात १८३ शस्त्र परवानगी रद्द करण्यात आली आहे. १२७ शस्त्र आणखी रद्द होणार आहेत. यामध्ये ८ जणांनी स्वतः सरेंडर होत आपली शस्त्रे जमा केली आहेत. सत्ता श्रीमंती आणि वर्चस्व दाखवण्याची हाऊस जपणाऱ्या बीडच्या शस्त्र परवानाधारकांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला दोन महिने उलटून गेल्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे .घाऊकपणे दिल्या जाणाऱ्या शस्त्र परवानांच्या तपासणीसाठी आता पावलं उचलली जात आहे. बीड जिल्ह्यात नोंदणीकृत 1281 शस्त्र परवाने आहेत. यात 310 प्रस्ताव रद्द करण्यासाठी पाठवण्यात आले असून यावर कारवाई करत आत्तापर्यंत 183 शस्त्र रद्द करण्यात आले आहेत. 127 शस्त्र रद्द होणार असल्याचा सांगण्यात आलंय. यात मृत असताना हे शस्त्र परवाना नावावर असणाऱ्यांची संख्या 118 एवढी आहे. ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे.

शस्त्र परवाना असणाऱ्यांच्या घरी पोलिस
विशेष म्हणजे जिल्ह्यात ज्यांच्याकडे शस्त्र परवाना आहे, त्यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून पोलीस कर्मचारी घरी जाऊन परवानाधारक शस्त्र हाताळण्यास सक्षम आहे का ? जिवंत आहे का ? याची खात्री करत आहेत. यात अनेक जण मृत असल्याचे समोर आले आहे. मृत असतानाही शस्त्र परवाना नावावर असणाऱ्यांचा आकडा 118 असल्याचे समजते .त्यामुळे आता हे सर्व शस्त्र परवाने रद्द केले जाणार आहेत .

हे ही वाचा :

Union budget मध्ये अनु क्षेत्रासाठी २० हजार कोटीची तरतूद

Union Minister Ramdas Athawale यांची अंबागोपाल फाऊंडेशनच्या कार्यक्रमात फटकेबाजी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss