बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात मुख्य आरोपी सुदर्शन घुगेसह इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. खंडणीसह याप्रकरणात ठपका ठेवल्यानंतर वाल्मिक कराडला अटक करण्यात आली. याप्रकरणात सीआयडी आणि एसआयटी तपास करत आहे. पण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या तपासावरच मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या SIT मधे हे महेश विघ्ने कसे? असा सवाल त्यांनी केला. बीड जिल्ह्यातील पोलिसांना एसआयटीत घेतले तर ते कसे चौकशी करतील? ही पोलीस वाल्मिक कराडला नमस्कार करणारी माणसं आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी बाहेरील अधिकारी नेमावी अशी मागणी त्यांनी केली. ह्या शासनाचं डोकं ठिकाणांवर आहे का? बीड अधिकारी बीड च्या boss ची निष्पक्ष चौकशी करणार का असा सवाल त्यांनी केला. त्यांनी सरकार एसआयटीच्या नावाखाली धुळफेक करत असल्याचा गंभीर आरोप केला. त्यांनी वाल्मिक कराड आणि एसआयटीतील अधिकारी महेश विघ्ने यांचा एकत्रित फोटो शेअर करत मोठे प्रश्न चिन्ह उपस्थित केले.बिंदू नामावलीप्रमाणे जिल्ह्यातील अधिकार्यांची नियुक्ती करण्याबाबत त्यांनी पुन्हा आवाज उठवला. बीड जिल्ह्यात एकाच जातीची अधिकारी, शिक्षक कसे अधिक आहे असा सवाल त्यांनी केला. त्यांनी यावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया याना बीड जिल्ह्यातून अनेकांचे धमकीचे फोन येत आहेत. नरेंद्र सांगळे या व्यक्तीसह त्यांनी अनेकांची नावं घेतली. त्यांचे समाज माध्यमांवरील धनंजय मुंडे यांच्यासोबतची फोटो त्यांनी दाखवले. अंजली दमानिया यांच्या आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर टाकून अश्लील पोस्ट टाकत असल्याची माहिती त्यांनी दिली. धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, वाल्मिक कराड चे हे कार्यकर्ते फोन करून धमक्या देत असल्याचा दमानिया यांचा आरोप आहे.
हे ही वाचा:
Bhau Torsekar थेट म्हणाले, Nikhil Wagle यांनी शिवसेना संपावी म्हणून पत्रकारिता केली…
Matoshree, Sanjay Raut, Uddhav Thackeray, Bhau Torsekar की… नेमकं कोण झालं बदनाम?