राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज सोमवारपासून सुरू होत असून रविवारच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.मात्र, विरोधी पक्षांनी नेहमीप्रमाणे या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. राज्यातील लोककल्याणकारी योजनांचा अर्थव्यवस्थेवर ताण असला तरी कोणतीही योजना बंद केली जाणार नाही,अशी ठाम ग्वाही रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना दिली. त्यांनी यावेळी हेही स्पष्ट केले की,”माझी लाडकी बहीण” योजना असो किंवा इतर कोणतीही कल्याणकारी योजना, राज्य सरकार त्यात कोणताही बदल करणार नाही. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात सुरू झालेल्या कोणत्याही योजना थांबविल्या नाहीत किंवा त्यांच्या चौकशीचे आदेश दिलेले नाहीत, असेही त्यांनी यावेळी ठामपणे स्पष्ट केले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं जुलै २०२४ पासून सुरु केलेली आहे. या योजनेच्या ७ हप्त्यांची रक्कम लाभार्थीं महिलांना मिळाली आहे. फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये लाभार्थी महिलांना मिळालेले नाहीत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे १५०० रुपये सोबत मिळतील अशा चर्चा सुरु आहेत. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी सरकारच्या वतीनं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत भाष्य केलं.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं जुलै २०२४ पासून सुरु केलेली आहे. या योजनेच्या ७ हप्त्यांनी रक्कम लाभार्थी महिलांना मिळाली आहे. फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये लाभार्थीं महिलांना मिळालेले नाहीत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे १५०० रुपये सोबत मिळतील अशा चर्चा सुरु आहेत. राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १५ फेब्रुवारीला परभणीतील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ३४९० कोटी रुपयांच्या चेकवर सही केल्याचं सांगितलं होतं. त्याच भाषणात अजित पवार यांनी पुढच्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळतील, असं म्हटलं होतं. फेब्रुवारी महिना संपला असून लाडक्या बहिणींना १५०० रुपये मिळाले नाहीत. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरु असल्याने पैसे मिळाले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते एकाच वेळी मिळू शकतात. म्हणजेच मार्च महिन्यात लाडक्या बहिणींना फेब्रुवारी मार्चचे ३००० रुपये मिळू शकतात.
हे ही वाचा:
Raksha Khadse: केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत धक्कादायक प्रकार