संपूर्ण जगाला हादरून सोडणाऱ्या कोविड १९ च्या महामारीनंतर चीनमध्ये एचएमपीव्ही (HMPV) या विषाणूच्या व्हायरसने थैमान घातले आहे. आता भारतात या विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. बेंगळुरू येथील रुग्णालयात एका आठ महिन्याच्या मुलींमध्ये HMPV या विषाणूची लागण झालेली झालेली दिसून आली. ही चाचणी एका खाजगी रुग्णालयाने केली होती. ज्यामध्ये मुलगी HMPV विषाणू पॉझिटिव्ह आढळली. फ्लूच्या सर्व नमुन्यांपैकी ०.७ टक्के एचएमपीव्हीचे आहेत.जेव्हा एचएमपीव्ही विषाणूचा संसर्ग होतो तेव्हा रुग्णांमध्ये सर्दी आणि कोविड १९ सारखी लक्षणे दिसू लागतात. त्याचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होत आहे. यापैकी २ वर्षांखालील मुलांना सर्वाधिक त्रास होतो.
एचएमपीव्ही विषाणू तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे. हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँड मध्ये २००१ या वर्षी आढळला होता. एचएमपीव्ही या सामान्य श्वसन विषाणूच्या संसर्गाचे सर्दी हे प्रमुख लक्षण आहे. श्वसनमार्गाचे विकार आणि फ्लूप्रमाणे हिवाळा तसेच उन्हाळाच्या सुरुवातीला हा त्रास उद्भवतो. त्या अनुषंगाने एनसीडीसी (दिल्ली) यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदना मध्ये महाराष्ट्रात आत्तापर्यंत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही, असे स्पष्ट झाले आहे.
एचएमपीव्ही (HMPV) व्हायरस म्हणजे काय?
एचएमपीव्ही हा आरएनए विषाणू आहे. यामुळे साहस सर्दीसारखी लक्षणे दिसतात. यामुळे घशात खोकला किंवा घरघर होऊ शकते. वाहणारे नाक किंवा घसा खवखवणे असू शकते. थंड हवामानात त्याचा धोका जास्त असतो.
एचएमपीव्ही (HMPV) व्हायरस कसा पसरतो?
एचएमपीव्ही विषाणू खोकताना आणि शिंकण्याद्वारे पसरतो. हा विषाणू संक्रमित व्यक्तीच्या संपर्कातून पसरतो. संक्रमित व्यक्तीशी हस्तांदोलन करून किंवा विषाणूने संक्रमित झालेल्या कोणत्याही वस्तूला देखील त्याचा प्रसार होऊ शकतो. पुढील ३ ते ५ दिवसात त्याची लक्षणे दिसू लागतात.
हे ही वाचा:
Bhau Torsekar थेट म्हणाले, Nikhil Wagle यांनी शिवसेना संपावी म्हणून पत्रकारिता केली…
Matoshree, Sanjay Raut, Uddhav Thackeray, Bhau Torsekar की… नेमकं कोण झालं बदनाम?