spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

बीड पोलिसांची मोठी कारवाई; आठवले गॅंगवर मकोका

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. देशमुख किटुम्बियांच्या न्यायासाठी मोर्चे देखील काढण्यात आले आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणातले ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे. सगळ्या आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. वाल्मिक कराडचे नाव राज्यभरात चर्चेत आले असून खंडणी व खून प्रकरणात त्यांच्यावर आरोप होत आहे. वाल्मिक कराडचे पोलिसांशी हितसंबंध असून पोलिसांकडूनच त्याला बळ देण्यात येत असल्याचेही आरोप जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी केले आहेत.

 

दरम्यान, खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर त्याच्यावर मकोका अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अलर्ट झाली असून बीडमधील आणखी एका गँगकवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलीय. डिसेंबर महिन्यात गोळीबार करणाऱ्या आठवले गॅंगवर देखील पोलिसांनी आता मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस अधिकारी शितल बल्लाळ यांच्यावर आरोप करत ऑडिओ क्लीप व्हायरल करणाऱ्य सनी आठवलेची ही आठवले गँग आहे.

बीड पोलिसांनी मागील महिनाभरात जिल्हाभरात दहशत माजविणाऱ्या दोन गँगवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. वाल्मिक कराडशी जवळीस असलेल्या सुदर्शन घुले याच्या गँगवर मकोका लावल्यानंतर आज बीड पोलिसांनी आठवले गॅंगवर देखील मकोकाची कारवाई केलीय. 13 डिसेंबर 2024 मध्ये पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत गोळीबारची घटना घडली होती. त्यातील सहा आरोपींवरही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने अक्षय आठवले, सनी आठवले, आशिष आठवले, मनीष क्षीरसागर आणि ओंकार सवई यांचा समावेश आहे. या आरोपींनी आतापर्यंत 19 गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याची पोलीस दफ्तरी नोंद आहे. या संपूर्ण गुन्ह्याचा तपास केल्यानंतर आता आठवले गँगवर मकोका कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ आणि सनी आठवले याची कथित ऑडिओ क्लिप वायरल झाली होती. याच आठवलेवर ही कारवाई करण्यात आली आहे.

सनी आठवलेने आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन भलीमोठी पोस्ट करत एक ऑडिओ क्लीप व्हायरल केली होती. त्यामध्ये, पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ आणि वाल्मिक कराडचे संभाषण असून कराडच्या सांगण्यावरुन पोलीस कामकाज करत असल्याचा आरोप आरोपी सनी आठवलेने केला होता. आता, त्याच्यावरही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

टोळ्यांची माहिती घेऊन कारवाई होणार – कावत
ज्या ठिकाणी गंभीर गुन्हे घडत आहेत. त्या ठिकाणी मकोका प्रस्ताव पाठवला जाणार आहे. तसेच गंभीर स्वरूपातील गुन्हेगाराची पार्श्वभूमी आणि टोळीची माहिती घेऊन ही कारवाई सुरू राहणार असल्याचं पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : 

एस. टी च्या टप्पा वाहतूक सेवेची १४.९५ टक्के भाडेवाढ करण्यास मान्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss