spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

संजय शिरसाट यांना मोठा झटका, ‘या’ पदावरून हटवलं, शिंदे गटात घडतंय काय?

Sanjay Shirsat CIDCO : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांना मोठा धक्का बसला आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना अखेर सिडकोच्या अध्यक्ष पदावरून हटवण्यात आले. तर भरतशेठ गोगावले यांनाही एसटी महामंडळाच्या अध्यक्ष पदावरून हटवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान अध्यक्ष पदासाठी लागलीच आमदारांमध्ये लॉबिंग सुरू झाले आहे. खरंतर मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सिडकोचा राजीनामा देणं अपेक्षित होतं. पण त्यांनी स्वतःहून राजीनामा न दिल्यामुळे राज्य सरकारकडून शिरसाटांना सिडकोच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं आहे.

मंत्रिपदाची लॉटरी लागूनही महामंडळावर मांड ठोकून बसलेल्या मंत्र्यांना मात्र आता झटका बसत आहे. शिंदे गटातील मंत्र्यांना एकामागोमाग एक झटके मिळत आहेत. एकनाथ शिंदे यांनी (शिवसेना) बंडानंतर भाजपसोबत सत्तास्थापन केली होती. त्यानंतर नाराज संजय शिरसाटांना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारकडून सिडको महामंडळाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले होते. पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मळाल्यानंतर संजय शिरसाटांची मंत्रि‍पदाची लॉटरी लागली. त्यांच्याकडे सामाजिक न्याय हे खाते सोपवण्यात आले. यानंतर त्यांनी सिडकोचे अध्यक्ष पद सोडणे आवश्यक होते.पण मंत्रिपद भूषवित असतानाच सिडकोच्या अध्यक्षपदावरही कार्यरत असल्याने त्यांना आता सरकारकडून शिरसाटांना सिडकोच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं आहे.

अध्यक्ष पदासाठी आमदारांमध्ये सेटिंग
भरतशेठ गोगावले यांनाही एसटी महामंडळाच्या अध्यक्ष पदावरून हटवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.दरम्यान लवकरच आता नवीन सिडको अध्यक्षाची निवड केली जाईल.सिडकोचे अध्यक्षपदासाठीही आता मोठ्या प्रमाणात सेटिंग सुरू झाले आहे. नवी मुंबईतील आमदार आणि इतरांनी या पदासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. तर दुसरीकडे सिडकोचा तांत्रिक कारभार सुधारावा म्हणून ऑनलाईन पद्धतीने कारभार होण्याची देखील शक्यता आहे.

हे ही वाचा : 

नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss