spot_img
Wednesday, January 15, 2025

Latest Posts

विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम; बारावी CBSC आणि CET ची परीक्षा एकाच दिवशी

राज्यात दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. बारावी CBSC परीक्षांचे तारखा आणि राज्यातील CET परीक्षांच्या तारखा एकत्र आल्याने राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय. राज्य cet सेलने अलीकडेच विविध अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. १ ते ४ एप्रिल दरम्यान एकीकडे CBSC बोर्डाची परीक्षा असताना याच तारखांमध्ये BSC, BBA,BMS, BBM, आणि ५ वर्षाच्या LLB अभ्यासक्रमाची CET परीक्षा येत असल्याने विध्यार्त्याची अडचण झाली आहे. ४ एप्रिल रोजी असलेला CBSC चा मानसशास्त्राचा पेपर आणि MAH- LLB पाच वर्षाच्या अभ्यासक्रमासाठीची CET परीक्षा एकाच दिवशी नियोजित आहे.

परीक्षांचे वेळापत्रमध्ये बदल करण्याची मागणी
सीईटी सेलने एक ते चार एप्रिल दरम्यानच्या परीक्षांचे वेळापत्रकामध्ये बदल करावा अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून करण्यात आली आहे. कारण एक ते तीन एप्रिल दरम्यान बीसीए,बीबीए, बीएमएम,बीएमएस अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा नियोजित केल्या आहेत. याच एक ते तीन एप्रिल तारखेला बारावी सीबीएसई बोर्ड परीक्षांचे इतिहास, भाषा विषय आणि होम सायन्स विषयांचे सलग तीन दिवस पेपर असणार आहेत. तर 4 एप्रिलला एलएलबी पाच वर्षे अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा नियोजित आहे. त्याच दिवशी बारावी सीबीएससी बोर्डाच्या सायकॉलॉजीचा पेपर असणार आहे. सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा आणि सीईटी परीक्षा यामुळे विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन महत्त्वाच्या परीक्षांचा सामना करावा लागणार आहे.सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा आणि सीईटी परीक्षा यामुळे विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन महत्त्वाच्या परीक्षांचा सामना करावा लागणार आहे.

परीक्षांच्या तारखा एकाच कालावधीत आल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बारावीच्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा आणि सीईटी परीक्षा या दोन्ही महत्त्वाच्या असून, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य वेळ मिळण्याची गरज आहे. पालक आणि विद्यार्थ्यांकडून सीईटी सेलला या परीक्षांचे वेळापत्रक पुन्हा नियोजित करण्याची मागणी होत आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून सीईटी सेलने वेळापत्रकात बदल करावा आणि परीक्षांमध्ये होणारा गोंधळ टाळावा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

हे ही वाचा:

लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश

“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss