spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

राज्यातील कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करण्याबाबत फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवण्यासाठी कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन आहे. त्यासाठी कृषी विभागानं सहकार विभागासोबत समन्वय करून या प्रकल्पाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासून पाहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बैठकीत दिले.

राज्यातील कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्याबाबत आज बैठक घेतली. शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी येत्या काळात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (‘एआय’चा) वापर अनिवार्य आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवण्यासाठी कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन आहे. त्यासाठी कृषी विभागानं सहकार विभागासोबत समन्वय करून या प्रकल्पाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासून पाहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या बैठकीत दिले.

येत्या काळात बदलते हवामान, अवेळी पडणारा पाऊस, पिकांवर वारंवार होणारा रोगांचा प्रादुर्भाव, मजूरांचा तुटवडा यांवर मात करत शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेला पर्याय नाही. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यामुळे पीक आरोग्याचं विश्लेषण, मातीतील कार्बन प्रमाण शोधणं, मातीच्या आरोग्याची सविस्तर माहिती, तणाचा प्रकार ओळखणं, पूर्वीच्या उत्पन्नाची तुलना, मातीचं तापमान, वातावरणातील आर्द्रता, पिकांवरील कीड व रोगांचा प्रादुर्भाव ओळखणं तसंच पिकांवरील जैविक-अजैविक ताण ओळखणं शक्य होणार आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केल्यास पिकाच्या उत्पादनात वाढ, मजुरी खर्चात बचत, रासायनिक खते व औषधांच्या वापरात कपात, कंपनी कार्यक्षमेत वाढ, रोगनियंत्रणाद्वारे बचत, पुरवठा साखळीतील कार्यक्षमतेत वाढ आणि एकूण खर्चात कपात होणे शक्य होईल. कृषी विभागाने सहकार विभागासोबत समन्वय करून या प्रकल्पाची तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता तपासून पाहावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

हे ही वाचा :

देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला का घाबरत आहे?- Sanjay Raut

परिषदेतील विचारमंथनाला अनुसरून आदिवासींच्या आरोग्यासाठी सर्वसमावेशक आरोग्य धोरण करू – CM Devendra Fadnavis

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा 

Latest Posts

Don't Miss