कोल्हापूरात (Kolhapura) जाण्यासाठी सोडण्यात आलेली सह्याद्री एक्स्प्रेस (Sahyadri Express) मागील दोन वर्षांपासून बंद करण्यात आली होती. गेल्या काही महिन्यांपासून सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा सुरु करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. कोल्हापुरातून सुटणारी कोल्हापूर ते मुंबई सह्याद्री एक्सप्रेस पुण्यापर्यंत सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर कोल्हापूर ते कलबुर्गी एक्सप्रेस सकाळच्या सत्रात तसेच पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी कोल्हापूरहून कुर्डूवाडीपर्यंत पॅसेंजर सुरु करण्याच्या निर्णयाला रेल्वे प्रशासनाने मान्यता दिली आहे.
पंढरपूरला (Pandharpur) जाणाऱ्या भाविकांसाठी कोल्हापूरहून कुर्डूवाडी मार्गावर पहाटे ५ वाजून ५० मिनिटांनी गाडी सोडण्यात येणार असल्याची माहिती सल्लागार सदस्य शिवनाथ बियाणी यांनी दिली आहे. दादर ते पंढरपूर एक्सप्रेसचा विस्तार मिरजेपर्यंत आणि कोल्हापूर ते सिकंदराबाद व्हाया कलबुर्गी एक्सप्रेस आठवडाभर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिरज ते पुणे आणि मिरज ते कोल्हापूर या विभागांमध्ये काही एक्सप्रेस गाड्यांना वळीवडे, रुकडी, सांगली, किर्लोस्करवाडी, ताकारी, कराड आणि सातारा येथे थांबा मिळणार आहे. तसेच येथील काही रेल्वे स्थानकावर थांबा करण्याची माहिती सीनियर डिव्हिजन ऑपरेटर मॅनेजर डॉ. स्वप्रिल नीला यांनी दिली आहे. मिरज जंक्शन रेल्वेस्थानकाचा मॉडेल स्थानक म्हणूनच पुनर्विकास केला जाणार आहे. यासाठी ५०० कोटीची तरतूद करण्यात येणार आहे.
१० वर्षपासून रखडून राहिलेल्या वैभववाडी-कोल्हापूर रेव्ले मार्ग गतिमान करण्याची पीएम गतीशक्ती मार्गाची शिफारस करण्यात येणार आहे. या मार्गासाठी ३४११.१७ कोटी खर्च करण्यात येणार आहे. हे सर्व प्रकल्प सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी करण्यात येणार आहेत. या बैठकीत तीन रस्ते नई तीन रेल्वे प्रकल्प करण्यासाठी तब्ब्ल २८,८७५.१६ कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे.देशाच्या विकासासाठी वैभववाडी आणि कोल्हापूर मार्ग बनवणे खूप महत्वाचे आहे. पश्चिम महाराष्ट्रातून कोकणमध्ये औद्योगिक, शेतीसाठी रस्तेमार्गानेच वाहतूक केली जाते. वैभववाडी कोल्हापूर मार्ग झाल्यास महाराष्ट्राला त्याचा लाभ होणार आहे.
हे ही वाचा:
मुंबईतील चारही धरणात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा