spot_img
spot_img
Monday, September 25, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

टोमॅटोच्या भावात मोठी घसरण

गेल्या काही आठवड्यापासून टोमॅटोच्या (tomato) भावात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. राज्यभरात टोमॅटोची ही झालेली घसरण पाहून शेतकरी संतप्त झाले आहेत.

गेल्या काही आठवड्यापासून टोमॅटोच्या (tomato) भावात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. राज्यभरात टोमॅटोची ही झालेली घसरण पाहून शेतकरी संतप्त झाले आहेत. काहीकाही ठिकणी टोमॅटो मोठ्या प्रमाणावर फेकून देण्यात आले आहेत. ऑगस्ट महिन्यात एका जाळीमागे ६०० ते ८०० रुपये असणारे भाव आज ८० ते १२० रुपयांवर आले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

किलोमागे ४ ते ५ रुपये रुपये भाव मिळत असल्याने उत्पादनाचा खर्चसुद्धा निघत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कांद्यापाठोपाठ आता टोमॅटोच्या दरातदेखील मोठी घसरण झाली आहे. संतप्त शेतकऱ्यांनी कुठे रस्त्यावर टोमॅटो फेकून तर कुठे कॅरेट जाळत सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. G २० परिषदेमुळे दिल्लीत टोमॅटो जाण्यास अडचणी येत असल्याचं व्यापाऱ्यांकडून उत्तर दिलं जात असल्याच शेतकरी सांगत आहेत. मागच्या महिन्यात कमी पाऊस पडल्यामुळे काही जिह्ल्यात शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. खूप मेहनत करून कसा बसा शेतात पीक घेतलं आहे त्यामुळे दुसरीकडे शेतमालाला भाव मिळत नसल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यात नैताळे गावचे शेतकरी बाबाजी जेऊघाले हे गेल्या 5 वर्षांपासून शेतकरी टोमॅटोची शेती करत आहेत. यंदा त्यांनी १ एकरावर शेतीची लागवड केली आहे. खते, औषधे, मजुरी, वाहतूक खर्च करून दीड ते दोन लाख रुपये खर्च केला. तेव्हा चांगल्या प्रतिच्या टोमॅटोला १४५ रुपये क्रेट (२० किलोला) भाव व्यापाऱ्याने दिले आहेत. G २० परिषदेमुळे दिल्लीत टोमॅटो जाण्यास अडचणी येत असल्यामुळे व्यापाऱ्यांकडून त्यांना उत्तर दिलं गेलं. हे सर्व करून मिळाल्याला दरातून खर्च न निघाल्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे.

नाशिकच्या बाजारात टोमॅटोचा भाव अवघ्या १०० रुपये क्रेट विकल्यानंतर नाशिकच्या बाजारात टोमॅटोला २० रुपयांपासून तर १०० रुपये प्रती कॅरेट एवढाच भाव मिळाल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. मागच्या महिन्यात टोमॅटोला २५०० रुपये क्रेट असा भाव मिळाला होता. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाली आहे.

हे ही वाचा: 

अवधूत गुप्ते घेऊन आले आहेत ‘लावण्यवती’, ‘गणराया’ ही पहिली लावणी प्रदर्शित

देवेंद्र फडणवीसांची निर्दोष मुक्तता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss