राज्यातील १० वी आणि १२ वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आला आहे. २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत दहावीच्या परीक्षेला सुरवात होणार आहे. तर बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत होणार आहे. CBSC परीक्षेचंही वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आला. ही माहिती महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आला आहे. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुल्हाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे अंतिम वेळापत्रकाबाबतची माहिती दिली. दरवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे आठ ते दहा दिवस परीक्षा लवकर घेण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र बोर्डाची परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात येत आहे. पहिली शिफ्ट सकाळी 11:00 ते दुपारी 2:00 तर दुसरी शिफ्ट दुपारी 3:00 ते संध्याकाळी 6:00 पर्यंत असणार आहे. दहावीच्या परीक्षेचा पहिल्या पेपर मराठी भाषेचा असणारा आहे. तर बारावीचा पहिला पेपर इंग्रजीचा असणार आहे.महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर जाऊन विद्यार्थी वेळापत्रक डाउनलोड करू शकतात.
दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे प्रवेशपत्र जानेवारी 2025 मध्ये जारी करण्यात येणार असून महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हॉल तिकीट प्रसिद्ध केले जाईल. त्यामुळे, विद्यार्थ्यांना आता परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी अडीच ते 3 महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे.
दहावीच्या परीक्षेची सुरुवात इंग्रजी विषयाच्या परीक्षेनं होईल. तर,शेवटचा पेपर माहिती तंत्रज्ञान विषयाचा असेल, या विषयाची परीक्षा 18 मार्चला संपन्न होईल. तर, बारावीच्या परीक्षेची सुरुवात शारीरिक शिक्षण विषयानं होईल. तर 4 एप्रिलला मानसशास्त्र विषयाचा पेपर असेल. दहावीचे पेपर 10:30 ते 01:30 दरम्यान आयोजित केले जातील. बारावीच्या परीक्षेची वेळ देखील हिच असेल. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत यशस्वी व्हायचं असल्यास विद्यार्थ्याला प्रत्येक विषयात किमान 33 टक्के गुण मिळवावे लागतील.
एकीकडे विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असल्याने सर्वचजण निवडणूक प्रचारात आणि मतदान प्रक्रियेत दंग होते. शाळेतील शिक्षकांनाही निवडणूक मतदानाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, मतदान प्रक्रिया पार पडताच बोर्डाने 10 वी आणि 12 वी परीक्षेचं वेळापत्रक जारी केलं आहे.
हे ही वाचा: