spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

मोठी बातमी! इम्तियाज जलील यांच्यासह MIM च्या 30 आंदोलकांवर गुन्हे दाखल….  

डॉ बाबासाहेब आंबेडकरांबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटले. राज्यात अनेक ठिकाणी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांसह विरोधक एकत्र आले आणि आंदोलने केली. जोडे मारो आंदोलनासह विरोधक आक्रमक झाले होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील आणि त्याचे समर्थकांनी अमित शाह यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलन केले. आंदोलनादरम्यान गाढवाचा वापर करण्यात आला ज्यामुळे पोलिसांनी यावर आक्षेप घेत माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह एमआयएम पक्षाच्या 30 आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलकांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि गाढवाचा वापर केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

नेमकं प्रकरण काय?

राज्यसभेत भाषण करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात विरोधक आक्रमक झाले होते. राज्यसभेत अमित शाह यांनी यावेळी म्हणाले की, आंबेडकरांचे नाव घेणे ही एक फॅशन झाली आहे. सगळीकडे आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, म्हणायचे. त्यांनी देवाचे नाव इतक्या वेळा घेतले असते, तर स्वर्गात जागा मिळाली असती,असे शाह म्हणाले. राज्यसभेत झालेल्या संविधानावरील दोन दिवसीय चर्चेच्या समारोपात शाह यांनी मंगळवारी केलेल्या भाषणात काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यावेळी शाह यांनी आंबेडकरांचे नाव घेणे ही फॅशन झाली असल्याचे म्हटले.

अमित शाह यांच्या वक्तव्यावरून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला होता. राज्यात ठीक ठिकाणी आंदोलने करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथे MIM कडून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात गाढवाचा वापर करत जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी आक्षेप घेत इम्तियाज जलील यांच्यासह MIM च्या ३० आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. MIM पक्षाने या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाचे म्हणणे आहे की, हे आंदोलन शांततापूर्ण होते आणि जनतेच्या भावना व्यक्त करण्यासाठी करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे.या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरसह राज्यभरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. MIM च्या आंदोलनावर आणि पोलिसांच्या कारवाईवर राजकीय चर्चांना उधाण आले असून या प्रकरणाचा पुढील तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

हे ही वाचा:

Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?

लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss