spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

मोठी बातमी! केंद्रीय सरकारी कर्मचारी मालामाल; मोदी सरकारकडून ८व्या वेतन आयोगाला मंजुरी

क्रेंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मालामाल करणारी बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. केंद्र सरकारकडून वेतन आयोगासंदर्भात नवा विचार केला जात असल्याची चर्चा होती. ८ व्या वेतना आयोगाऐवजी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि वेतनासंदर्भात नव्या मेकॅनिझमबाबत विचार केला जात आहे. येणाऱ्या काळात नव्या फॉर्मुल्यानं कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होऊ शकते, अशी चर्चा वेतन आयोगासंदर्भात होती. मात्र आता नरेंद्र मोदींनी ८वा वेतन आयोगास मंजुरी दिली आहे. ८ वा वेतन आयोगाची स्थापन करण्यात आल्याची घोषणाच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. नेमकी काय माहिती दिली आहे अश्विनी वैष्णव यांनी आणि काय अपेक्षा आहेत आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना?कर्मचाऱ्यांच्या पगारात आतापर्यंत किती वाढ झाली? बघुयात…

 

१८४७ पासून आत्तापर्यंत ७ वेतन आयोगाला केंद्र सरकारीने मंजुरी दिली होती. आता, ८ व्या वेतना आयोगालाही केंद्र सरकारने मंजुरी दिल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली. केंद्र सरकारच्या सर्वच कर्मचाऱ्यांसाठी सरकारने ८ व्या वेतन आयोगाला मंजुरी देण्यात आली आहे. २०१६ साली यापूर्वीचा ७ वा वेतन आयोग मंजूर झाला होता. त्यानुसार, २०२६ मध्ये ८ वा वेतन आयोग लागू होईल. मात्र, २०२५ मध्ये ८ वा वेतन आयोग स्थापन केल्यास संपूर्ण प्रकियेसाठी १ वर्षाचा कालावधी मिळतो, असेही अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. केंद्र सरकार प्रत्येक १० वर्षांनी वेतन आयोग आणत असतो. सध्या देशात ७ वा वेतन आयोग आहे, याचा कार्यकाल २०२६ ला संपत आहे. त्या अगोदर अध्यक्ष आणि २ सदस्यांची नियुक्ती केली जाईल. सरकारने नियुक्त केलेला हा आयोग सर्व राज्यांशी चर्चा करेल. तसेच कर्मचाऱ्यांशी चर्चा आणि सूचना विचारात घेतल्या जातील.

७ व्या वेतन आयोगानुसार किती वाढली पगार
देशातील ७ व्या वेतन आयोगापूर्वी ४,५ आणि ६ व्या वेतना आयोगाचा कार्यकाळही १० वर्षांचा होता. सन २०१६ मध्ये ७ वा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ झाली होती. २.५७ चा फिटमेंट फैक्टर लागू करुन ७ वा वेतन आयोग देण्यात आला. त्यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मूळ पगारात २.५७ च्या पटीने वाढला. आता, सरकारने ८ वा वेतन आयोग स्थापनेस मंजुरी दिली असून फिटमेंट फॅक्टर कमीत कमी २.८६ पटीने पगार वाढ होऊ शकते.

आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना काय अपेक्षा?
आठव्या वेतन आयोगाकडून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढ आणि सुधारित फायदे अशा अपेक्षात आहेत. आतापर्यंतचा ऐतिहासिक ट्रेंड पाहिला आणि कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या मागण्यांचा विचार केला गेला तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या आयोगातून अनेक संभाव्य बदल आणि फायदे मिळण्याची अपेक्षा आहे.

1. भरीव पगारवाढ
फिटनेस फैक्टर वाढः कर्मचारी संघटना 7व्या वेतन आयोगाच्या सध्याच्या २.५७ च्या तुलनेत किमान २.८६ च्या फिटमेंट फॅक्टरची अपेक्षा करत आहेत. याला मान्यता मिळाला तर केंद्रीय कर्मचाऱ्याच्या पगारात लक्षणीय वाढ होऊ शकते. याशिवाय प्रवेश-स्तरीय पगारात देखील लक्षणीय वाढ होऊ शकते आणि पेन्शन गणनेवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

2. सुधारित भत्ते
घरभाडे भत्ता (HRA), महागाई भत्ता (DA) आणि प्रवास भत्त्यामध्ये (TA) प्रमाणबद्ध समायोजन होण्याची शक्यता आहे. तसेच दुर्गम किवा आव्हानात्मक ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वाढीव फायदे अपेक्षित आहेत.

3. पेन्शन सुधारणा
सुधारित वेतन रचनेशी सुसंगतता सुनिश्चित निवृत्तांसाठी सुधारित पेन्शन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन प्रणालीच्या (NPS) फायद्यांचे संभाव्य पुनर्मूल्यांकन करणे अपेक्षित आहे.

4. वेतन सरचनेचे सरलीकरण
प्रणाली सुलभ करण्यासाठी वेतन बैंड, आणि ग्रेड पेचे तर्कसगतीकरण आणि वेतन रचना अधिक पारदर्शक आणि समजण्यास सोपी करण्यासाठी प्रयत्न अपेक्षित आहेत.

5. महागाई भत्त्यावर परिणाम
सध्याच्या महागाईच्या ट्रेड आणि वाढत्या राहणीमानाच्या खचचेि प्रतिबिंबित करणारे महागाई भत्ता (DA) दर वाढण्याची अपेक्षा आहे.

6. अपेक्षित कालमर्यादा
डिसेंबर २०२५ पर्यंत शिफारसी सादर केल्‌या जाण्याची शक्यता आहे आणि त्याची अंमलबजावणी १ जानेवारी २०२६पासून अपेक्षित आहे.

८वा वेतन लागू करताना प्रमुख आव्हाने कोणती?

८वा वेतन लागू करताना कर्मचायांच्या अपेक्षांसह आर्थिक जबाबदारी संतुलित करणे आणि विविध कर्मचारी गटांच्या मागण्यांचे निष्पक्षपणे निराकरण करणे ही सरकारपुढील प्रमुख आव्हाने असतील, आयोगाने त्याची पुनरावलोकन प्रक्रिया सुरू केल्यानंतर अचूक तपशील स्पष्ट होतील, परंतु कर्मचारी राहणीमानाच्या खर्च आणि महागाईशी जुळणारे वेतन आणि लाभांमध्ये लक्षणीय सुधारणांची अपेक्षा करू शकतात.

कर्मचाऱ्यांच्या पगारात आतापर्यंत किती वाढ झाली?

४था वेतन : २७.६% वाढ. किमान वेतन ₹७५०.
५वा वेतन : ३१% वाढ. किमान वेतन ₹२,५५०.
६वा वेतन : फिटमेंट फैक्टर १.८६ ठेवला गेला. ५४% पगारवाढ. किमान वेतन ₹७,000.
७वा वेतन : फिटमेंट फैक्टर २.५७ ठेवला गेला. मात्र पगारवाढ फक्त १४.२९% झाली.
८वा वेतनच्या स्थापनेनंतरही फिटमेंट फैक्टरचाच आधार ठेवला जाईल. जर फिटमेंट फैक्टर ३.६८ केला गेला, तर किमान पगारात ४४.४४% वाढ होऊ शकते. त्यामुळे किमान वेतन ₹२६,000 होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : 

सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावर करीना कपूरची पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणाली…

अखेर सैफ अली खानच्या घराबाहेरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित दिसलेच…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss