लोकसभा निवडणूका झाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी झालेत. राज्याची विधानसभा निवडणूक झाली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. आता स्थानिक स्वराज्य संथांच्या निवसणुकांचे वेध कार्यकर्ते व राजकीय पक्षाच्या प्रमुखांना लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य पक्षांच्या निवडणुकांची तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे महाविकास आघाडी राहणार की नाही अशी चर्चा आता होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २२ जानेवारी रोजी ही सुनावणी होत असून अंतिम सुनावणी व्हावी, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच म्हंटल होत.
लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची बिगुल वाजणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना राज्य पातळीवर वेग आला असून लवकरच राज्य निवडणूक आयुक्त यांच्या नावाची शिफारस होणार आहे, विशेष म्हणजे आजच ही शिफारस गेली जाणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रातील जवळपास 29 महागनरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 पंचायत समित्यांवर सध्या प्रशासक काम करत असून गेल्या 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून प्रशासक नेमण्यात आल्याने स्थानिक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कधी होणार निवडणूका?
गेल्या अनेक दिवसांपासून राज्य निवडणूक आयुक्तांचे पद रिक्त आहे. त्यामुळे निवडणुकांपूर्वी ह्या पदावर नियुक्ती करणे महत्वाचे आहे. मंत्रिपरिषदेच्या बैठकीत चर्चा करुन राज्य निवडणूक आयुक्तांच्या नावांची शिफारस केली जाणार आहे. सध्या आरक्षणाच्या मुद्यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र, याच महिन्यात याप्रकरणी सुनावणी होणार आहे. त्यातच, ही सुनावणी अंतिम व्हावी, यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापू्र्वीच सांगितलं होतं. त्यामुळे, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आता वेग आल्याचे दिसून आले. साधारणत: एप्रिल महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासाठीच राज्य निवडणूक आयुक्तांच्या नावाची आज शिफारस केली जाणार आहे.
हे ही वाचा :
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावर करीना कपूरची पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणाली…
अखेर सैफ अली खानच्या घराबाहेरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित दिसलेच…
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .