विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला. उद्धव ठाकरे यांचा पक्ष आपला प्रभाव पाडू शकला नाही. त्यांच्या पक्षाचे अवघे २० आमदार निवडून आले. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ५७ आमदार निवडून आले. या धक्क्यातून उद्धव ठाकरे यांचा पक्ष अजून सावरला नाही. त्याचवेळ नाशिकमधून उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी बातमी आली आहे. एसटी कामगार सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता असताना हा पक्षप्रवेश झाला आहे.
नाशिक हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गड मानला जात होता. लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाझे विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना पराभूत केले होते. त्यानंतर विधानसभा निडणुकीत महायुतीने नाशिक जिल्यात चांगली कामगिरी केली. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या एसटी कामगार सेनेच्या शेकडो पदधिकाऱ्यानी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थतीत शेकडो एसटी कर्मचारी सेनेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश केला आहे.उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या कामांवर प्रभावित होऊन आपण प्रवेश केल्याच्या भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
एकनाथ शिंदे यांची अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत बंड केले. ४० आमदारांना घेऊन त्यांनी भाजपशी युती केली. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मुख्यमंत्री काळात लाडकी बहीण योजना महायुतीने आणली. या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले. निवडणुकी दरम्यान आणि निवडणुकीनंतरही अनेक शिवसेना उबाठाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आले. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला लागलेली ही गळती अजूनही सुरु आहे. आता नाशिकमध्ये शिवसेनेच्या एसटी कामगार सेनेला खिंडार पडले आहे.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका