spot_img
Saturday, March 22, 2025

Latest Posts

आत्ताची सर्वात मोठी बातमी, परळी पोलीस ठाण्याबाहेर वाल्मिक कराडच्या आईच आंदोलन, म्हणाली ‘माझ्या लेकाने…’

संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप सर्वत्र होताना दिसत आहे. 2 कोटी रुपये खंडणी मागितल्याच्या प्रकरणात सध्या तो तुरुंगात आहे. असा असताना वाल्मिक कराडची आई परळी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलनाला बसली आहे. मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. काल संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं. तर वाल्मिक कराड याला मोक्का कायदा लावा नाहीतर आम्ही आत्मदहन करू,असा निर्वाणीचा इशारा यावेळी देण्यात आला.

आज खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडची आई पारुबाई कराड या परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलनाला बसल्या आहेत. आपल्या मुलाला सोडावं. तो निर्दोष आहे असं पारुबाई कराड यांचं म्हणणं आहे. त्या 75 वर्षांच्या आहेत. वाल्मिक कराडवर खंडणीच्या गुन्ह्यात अन्याय झालाय असं पारुबाई कराड यांचं म्हणणं आहे. ‘माझ्या मुलाला न्याया द्या’ असं म्हणत त्या परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलनाला बसल्या आहेत. “माझ्या लेकाने काही केलं नाही. माझ्या लेकासाठी मी जीव द्यायला तयार आहे. इथून उठणार नाही” असं पारुबाई कराड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. तर खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडला अटक झाली आहे, त्यावर आपले मत देताना त्या म्हणाल्या की, ‘हे सर्व खोटं आहे’. यावर पुन्हा पत्रकारांनी विचारले असता, कोण करतय हे सर्व? जाणीवपूर्वक वाल्मिक कराड यांना अडकवलं जातंय का? त्यावर ‘काय माहित’ असं त्यांनी उत्तर दिलं.

या प्रकरणात कोणी कोणाला कसे फोन केले, त्याचे सर्व पुरावे पोलिसांना दिले आहेत. पण पोलीस सर्व गुन्हेगारांना हत्येच्या गुन्ह्यात का आरोपी बनवतं नाहीत, असं धनंजय देशमुख यांचं म्हणणं आहे. त्यांचा रोख वाल्मिक कराडवर होता. वाल्मिक कराडच्या संपत्तीचे सध्या खुलासे होताना दिसत आहेत. त्याने कुठे कशी प्रॉपर्टी विकत घेतली, ते पुरावे समोर येत आहेत. वाल्मिक कराड याची धनंजय मुंडेंसोबत मैत्री आहे, या मैत्रीमुळेच त्याला जिल्ह्याच्या राजकारणात बळ मिळालं असा आरोप विरोधकांकडून केला आहे.

Latest Posts

Don't Miss