Bird Flu in Maharashtra: बर्ड फ्लूचा H5N1 हा विषाणू पक्ष्यांपासून माणसांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे काळजी घेणे महत्त्वाचे आहे, विशेषतः पोल्ट्री फार्म किंवा पक्ष्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी अधिक सावध राहणे गरजेचे आहे. राज्यात मागील दोन महिन्यांपासून बर्ड फ्ल्यूने शिरकाव केला आहे. यामुळे राज्यातील अनेक भागात कोंबड्याना लागण झाल्याचे समोर आले होते. यात कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. मात्र मागील काही दिवसात प्रमाण कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा बर्ड फ्ल्यूने डोके वर काढले आहे. यात धाराशिवमध्ये कोंबड्यांचा मृत्यू झाला असून हा मृत्यू बर्ड फ्ल्यूनेच झाल्याचे समोर आले आहे. यामुळे धाराशिव मध्ये खळबळ उडाली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील ढोकी परिसरात काही दिवसांपूर्वी मृत कावळे आढळून आले होते. या कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथे पाठविण्यात आले होते. दरम्यान याचा अहवाल प्राप्त झाला असून मृत कावळ्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे अहवाल म्हटले आहे. सदरचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पशुसंवर्धन विभाग अलर्ट झाला असून गावातील कोंबड्या किंवा पक्षांना लागण तर झालेली नाही; याची तपासणी सुरु करण्यात आली आहे. यासाठी टीम कार्यरत आहे. पशुसंवर्धन विभाग, ग्रामपंचायत अलर्ट मोडवर आले असून कावळ्यांचा मृत्यू झालेल्या परिसरात विविध उपायोजना राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पोलीस ठाण्याचा परिसर, सुभाष देशमुख यांचे घर प्रतिबंधित करण्यात आले आहे. तर ढोकी शहराच्या १० किमी त्रिजेचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आलाय. या परिसरातील कुक्कुटपालन केंद्रावरील पक्षांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत. तसेच परिसरातील मटन,मास विक्री देखील बंद राहणार आहे.
कोरोनानंतर भारातात आलेल्या बर्ड फ्लूने केरळ राजस्थान मध्य प्रदेश, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात हाहाकार दिसून आला. त्याच दरम्यान, अनेक ठिकाणी स्थलांतर करून येणाऱ्या कावळ्यासह इतर पक्षांच्या मृत्यूंमध्ये झालेल्या वाढीने चिंतेचे वातावरण पसरले होते. आता पुन्हा एकदा बर्ड फ्लूने डोके वर काढले असून धाराशिव जिल्ह्यात बर्ल्ड फ्लूची एन्ट्री झाल्याने पशुसंवंर्धन विभागासाह ग्रामपंचायतही अलर्ट मोडवर आली आहे. ढोकी गावात कोंबड्यांऐवजी कावळ्यांचा पटापट मृत्यू झाल्याने मोठी चिंता व्यक्त करण्यात येत असून परिसरात उपाययोजनांना सुरुवात झाली आहे.
हे ही वाचा:
Rashmika Mandanna: साऊथ अभिनेत्री रश्मीका मंदानाकडे कोट्यवधींची प्रॉपर्टी, ५ महागड्या गाड्या
Amol Kolhe: स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा शेवट का गुंडाळण्यात आला? अमोल कोल्हेंचा मोठा खुलासा