Breaking! Watch Video : सध्या राज्याच्या राज्यात अनेक घडामोडी या चालू आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान हे होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचार प्रचार हा थांबला आहे. परंतु प्रचार संपल्यानंतर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.
माजी गृहमंत्री यांच्या गाडीवर आज संध्याकाळी भीषण जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा कट भाजपचा असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. या हल्ल्यानंतर राज्यातील निवडणूक रक्तरंजित होत आहे .
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाली आहे. या दगडफेकीत अनिल देशमुख जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अनिल देशमुख यांचे चिरंजीव हे काटोल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आहेत. त्यांची शेवटची सांगता सभा आटोपून अनिल देशमुख आपल्या घरी काटोलला परतत असताना अज्ञात व्यक्तीने देशमुखांच्या गाडीवर दगड फेकला. अनिल देशमुख यांच्यावर काटोल जलालखेडा मार्गावर बेलफाट्याजवळ अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात अनिल देशमुख यांच्या गाडीचा काच फुटला आणि थेट अनिल देशमुखांच्या डोक्याला लागला. या दगडफेकीत देशमुख जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांच्यावर काटोल येथील रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे