आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्यासाठी नागरिकांना घेण्यासाठी आलेल्या गाड्या परत पाठवण्यात आल्या आहेत. नाशिक गावबंदी असल्यानं शेवगाव तालुक्यातील मठाचीवाडी येथील मराठा समाजाच्या वतीनं निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, मनोज जरांगेंच्या आवाहानानंतर मंत्री विखे यांच्या कुटुंबीयांविरोधात मठाचीवाडी येथील सकल मराठा समाज आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळत आहे.
शेवगाव तालुक्यातील भातकूडगाव येथे पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी बसेस अडवण्यात आल्या होत्या. अहमदनगर जिल्ह्यातील सकल मराठा समाज आक्रमक झाला असून गावागावत नेत्यांना गावबंदी केली जात आहे..
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांची गाडी देखील अडवण्यात आली आहे.
तसेच, काही गावकऱ्यांनी मराठा आरक्षणाबाबत अरुण मुंडे यांना देखील जाब विचारला आहे.
मोदी आज शिर्डी दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डीतील साईमंदिरात दर्शनासाठी येणार आहे. दुपारी 1 वाजता पंतप्रधान मोदी साईमंदिरात दर्शन घेतील. मोदींच्या हस्ते साईबाबांची पाद्यपूजा आणि आरती होईल. साईबाबा संस्थानच्या वतीने पंतप्रधानांचा सत्कार केला जाईल. मात्र पंतप्रधान मंदिरात असताना अर्ध्यातासाठी दर्शन रांग बंद राहणार आहे. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी आणि अकोले या दोन ठिकाणी विविध प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा होणार आहे.२०१८ मध्ये साई समाधी शताब्दी सोहळ्या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत आले होते, त्यानंतर पाच वर्षांनी पंतप्रधान मोदी साई समाधीचे दर्शन घेतील आहे.
जरांगे आमरण उपोषणावर ठाम असणार आहेत.
सरकारला देण्यात आलेली ४० दिवसांची मुदत संपल्यानं मनोज जरांगे यांनी पुन्हा जालना येथील आंतरवाली सराटी गावात उपोषणाला सुरुवात केली आहे. आपण आमरण उपोषण सुरू केल्याची घोषणा देखील जरांगे यांनी केली होती. मात्र, छत्रपती संभाजीराजे यांनी जरांगे यांची भेट घेऊन उपोषणादरम्यान पाणी पिण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे संभाजीराजे यांचा मान राखत आपण पहिल्या दिवशी पाणी घेणार असून, आजपासून म्हणजेच, आजपासून जरांगे आमरण उपोषण करणार असल्याचो घोषणा जरांगे यांनी केली आहे. त्यामुळे, आज देखील सरकारकडून जरांगे यांच्याशी संपर्क केले जाण्याची शक्यता आहे. तर, त्यानंतर जरांगे यांची भूमिका महत्वाची असणार आहे.
हे ही वाचा :
संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
लग्नाच्या 5 वर्षांनंतर आला दीपवीरच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल