spot_img
spot_img
Wednesday, October 4, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

डिझेल कार घेणे होणार महाग…

रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी सांगितले की, डिझेल इंजिन वाहनांवर अतिरिक्त १० टक्के कर लावण्याचा प्रस्ताव ठेवण्याची योजना आहे.

रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी सांगितले की, डिझेल इंजिन वाहनांवर अतिरिक्त १० टक्के कर लावण्याचा प्रस्ताव ठेवण्याची योजना आहे. नितीन गडकरी म्हणाले की, हा प्रस्ताव अर्थमंत्र्यांकडे पाठवणार आहोत. ६३ व्या सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) च्या अधिवेशनात नितीन गडकरींनी ही माहिती दिली. गडकरींनी नमूद केले की त्यांनी मसुदा तयार केला आहे आणि जीएसटी वाढीची विनंती करण्यासाठी मंगळवारी झालेल्या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेण्याचा त्यांचा मानस आहे.

गडकरी म्हणाले की, देशातील डिझेल वाहनांचा वापर कमी करण्याचा हा एकमेव मार्ग आहे. गडकरींच्या विधानानंतर, दुपारी १२.०० वाजेपर्यंत, महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स २.३८%, टाटा मोटर्सचे शेअर्स २% आणि मारुती सुझुकीचे शेअर्स ०. ८% ने घसरत होते. डिझेल वाहने कमी करण्याबद्दल गडकरींनी यापूर्वीही आपले मत स्पष्ट मांडले होते. २०२१ मध्ये, गडकरींनी वाहन उत्पादकांना डिझेल-इंजिन वाहनांचे उत्पादन आणि विक्री कमी करण्याचे आवाहन केले होते.

मे महिन्याच्या सुरुवातीला, ऊर्जा परिवर्तन सल्लागार समितीने सुचवले होते की भारताने २०२७ पर्यंत १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये डिझेलवर चालणाऱ्या चारचाकी वाहनांवर बंदी घालावी. माजी पेट्रोलियम सचिव तरुण कपूर यांच्या नेतृत्त्वाखाली ऊर्जा परिवर्तन सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यात सरकारी तेल कंपन्यांचे अधिकारी आणि तेल मंत्रालयातील एक अधिकारी यांचा समावेश समितीत आहे.

हे ही वाचा: 

राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी उपोषण घेतले मागे

केंद्राच्या विशेष अधिवेशनात आरक्षणाचा मुद्दा मांडा , संजय राऊत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss