Wednesday, November 29, 2023

Latest Posts

आज सह्याद्रीवर मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक

मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे  यांनी पुन्हा एकदा चर्चेची तयारी दर्शवलीय. आरक्षणाचा चेंडू त्यांनी पुन्हा सरकारच्या कोर्टात ढकललाय.

मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे  यांनी पुन्हा एकदा चर्चेची तयारी दर्शवलीय. आरक्षणाचा चेंडू त्यांनी पुन्हा सरकारच्या कोर्टात ढकललाय. चर्चेची आजही तयारी आहे. चर्चा करण्यासाठी येणाऱ्यांना अडवणार नाही अशी भूमिका जरांगेंनी घेतली आहे. दरम्यान आज सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक बोलावण्यात आलीय. समितीनं आत्तापर्यंत केलेल्या कामाचा अहवाल समिती सादर करणार आहे.

माजी न्यायाधीश शिंदे समितीचे सदस्य आणि मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या गायकवाड समितीचे तत्कालीन अध्यक्ष उपस्थित राहणार आहे. मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीला समिती सदस्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील
शंभूराज देसाई, दादा भुसे, दीपक केसरकर दिलीप वळसे पाटील, नरेंद्र पाटील, योगेश कदम उपस्थित आहे.

 

बैठकीत काय होण्याची शक्यता?
सुप्रीम कोर्टात पुन्हा जाण्यासाठी गायकवाड समितीने केलेल्या शिफारशींचा पुन्हा एकदा आज आढावा होण्याची शक्यता
त्याच सोबत माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचे सर्वेक्षण याचाही होणार आज आढावा
सारथी संस्थेसह मराठा समाजाला दिल्या जाणाऱ्या उपायोजनांचाही आज आढावा घेतला जाईल
यामध्ये आणखी काही नवीन तरतुदी करण्याची शक्यता जेणेकरून मराठा समाजाचा रोष कमी होऊ शकेल
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचा आज पुन्हा एकदा आढावा घेतला जाईल.

Latest Posts

Don't Miss