Monday, June 5, 2023

Latest Posts

SSC आणि HSC चा निकाल कुठे पाहाल? जाणून घ्या सविस्तर

सध्या संपूर्ण राज्यातील जनतेचं लक्ष जसे राज्यातील राजकारणाकडे लागले आहे तसेच राज्यातील दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) विध्यार्थ्यांच्या निकालाकडे देखील लागले आहे.

सध्या संपूर्ण राज्यातील जनतेचं लक्ष जसे राज्यातील राजकारणाकडे लागले आहे तसेच राज्यातील दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) विध्यार्थ्यांच्या निकालाकडे देखील लागले आहे. नुकताच सीबीएससी (CBSC) आणि आयसीएससी (ICSC) बोर्डाचा बारावीचा निकाल नुकताच लागला. तसेच इतर राज्यातील देखील मोठ्या राज्याचे निकाल देखील लागले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष हे लागले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परिक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. आतापर्यंत बारावी बोर्डाचा निकाल हा मे महिन्याचा शेवटचा आठवडा किंवा जूनचा पहिला आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे तर दहावी बोर्ड (SSC Board) परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

कुठे पाहाल निकाल?

पुढील वेबसाइटवर पाहता येईल निकाल –

www.mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://ssc.mahresults.org.in

https://hscresult.mkcl.org/

https://hsc.mahresults.org.in

www.mahresult.nic.in

या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

 

SSC Result 2023: असा पाहा निकाल

  • दहावी/बारावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.
  • दहावी/बारावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा.
  • दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

 

हे ही वाचा:

नागपुरात झळकले आदित्य ठाकरेंचे पोस्टर्स, भावी मुख्यमंत्री…

Gautami Patil चा नादच खुळा!, थेट लग्नाच्या वाढदिवसाला नाच-गाण्याचा कार्यक्रम

Instagram ची सेवा रात्रीपासून ठप्प, जगभरातील लाखो यूजर्स वैतागले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss