spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

वाल्मिक कराडच्या साथीदार व कोरेगावच्या सरपंच बालाजी तांदळेच CCTV फुटेज व्हायरल; आरोपींसाठी ब्लॅंकेट खरेदी केल्याचा आरोप

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्याप्रकणात ६ जणांना अटक करण्यात आली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याला देखील अटक करण्यात आली आहे. या हत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीचा गठन करण्यात येत आहे. या हत्या प्रकरणाचा तपास निर्णायक वळणावर असताना आता आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. बीड शहर पोलीस ठाण्यात धनंजय देशमुख यांना बालाजी तांदळे याने धमकावल्याचा आरोप मध्यंतरी करण्यात आला होता. त्याच बालाजी तांदळेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.वाल्मिक कराड यांचे सहकारी आणि कोरेगावचे सरपंच बालाजी तांदळे यांचे हे सीसीटीव्ही फुटेज आहे. या फुटेजमध्ये बालाजी तांदळे हा एका दुकानातून ब्लॅंकेट खरेदी करताना दिसत आहेत. हेच ब्लॅंकेट पोलीस कोठडीत असलेल्या संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना देण्यात आल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे.

या सीसीटीव्ही फुटेज मध्ये बालाजी तांदळे आरोपींसाठी ब्लँकेट खरेदी करताना दुकानामध्ये दिसतो आहे. बालाजी तांदळे याने सीआयडी ऑफिसर असल्याची बतावणी करत बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मीक कराडला भेटण्यासाठी एन्ट्री केली होती. यावेळी तो वाल्मीक कराड याला भेटला देखील असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला होता. तर यावेळी बालाजी तांदळे याने सुदर्शन घुलेचा फोटो दाखवून धमकावल्याची तक्रार देखील धनंजय देशमुख यांनी केली होती.

याच बालाजी तांदळेने आरोपी विष्णू चाटे याला पाण्याच्या बॉटल्स न्यायालयात दिल्याचे समोर आले होते. आता विष्णू चाटे, सुदर्शन घुले, जयराम चाटे, महेश केदार यांना गेवराईच्या पोलीस कोठडीत ठेवले होते. त्यादरम्यान त्यांना लागणारे साहित्य बालाजी तांदळेने एका दुकानातून खरेदी केले. याचाच हा सीसीटीव्ही समोर आलाय. आणि हे पोलीस कोठडीत असलेले आरोपी साठीच ब्लँकेट घेतले होते, असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. हे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे आता बालाजी तांदळे याला पोलीस चौकशीसाठी ताब्यात घेणार का, हे पाहून महत्वाचं आहे. कोठडीतील आरोपींना ब्लँकेट पुरवल्याची बाब सिद्ध झाल्यास बालाजी तांदळे याच्या अडचणी वाढू शकतात.

हे ही वाचा : 

Latest Posts

Don't Miss