आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त आज १६ फेब्रुवारीपासून शिवोत्सव सोहळ्याचा शुभारंभ झाला आहे. शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संभाजीनगरच्या वतीने सदरील सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. संभाजीनगरातील क्रांती चौकात शिवकालीन दुर्मिळ अशा शस्त्रांचे प्रदर्शन या ठिकाणी भरविण्यात आले आहे. या प्रदेशाला शहरातील विद्यालयीन मुलं-मुली व नागरिक या ठिकाणी बघण्यासाठी गर्दी करत आहेत. नवीन पिढीला शिवाजी महाराज यांचा इतिहास समजावा व त्या काळातील शस्त्रांचा इतिहास जाणून घेण्यासाठी या शास्त्राचे प्रदर्शन सध्या क्रांती चौकात ठेवण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार विद्यार्थ्यांनी आचरणात आणायला पाहिजे-अंबादास दानवे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त क्रांती चौकामध्ये शिवसेना उबाठा गटाच्या वतीने शस्त्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या शस्त्र प्रदर्शनाला आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट दिली. नवीन पिढीला या शस्त्रांची जाणीव व्हावी माहिती व्हावी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये आपल्या पूर्वजांनी हे शस्त्र कसे हाताळले, कशी वापरले शत्रुवर कशी मात केली याचा इतिहास त्यांना कळावा अर्जित सिंग, मायकल जॅक्सनच्या रंगात राहिला तर काही होणार नाही शिवाजी महाराजांची विचार आचरणात आणायला पाहिजे, असे यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.
वाघ नखाचे प्रदर्शन सरकार सगळीकडे नेत आहे पण ते खरं आहे की नाही तो विषय नाही. खऱ्या अर्थाने वाघ नखं जी आहेत, त्यांचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी एकदाच केला नंतर त्या वाघ नखांच काय झालं हे सर्वांना माहीत आहे. त्या वाघ नखांचा इतिहास जनतेला कळायला पाहिजे. समुद्रामध्ये शिवस्मारक बनवण्याचा शो करायला नको होता. ज्या गोष्टी होत नाही आणि त्या गोष्टी करायला होणार सांगायला काहीच अर्थ नाही. या सरकारने समुद्रामध्ये शिवस्मारक करण्याची घोषणा केली आहे आणि त्यांच्याकडून हे काम कधीच होणार नाही, असा दावा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी बोलताना केला.