spot_img
Wednesday, January 15, 2025

Latest Posts

आळंदीतल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ कृतीचे होतंय कौतुक!, जिरेटोपाचा मान शिवछत्रपतींचाच!

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शुक्रवारी सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त साताऱ्यातील कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

CM Devendra Fadnavis : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शुक्रवारी सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त साताऱ्यातील कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी, राष्ट्रवादीचे नाराज आमदार छगन भुजबळ हेही उपस्थित होते. त्यानंतर, फडणवीसांनी पिंपरी चिंचवडमधील देवाची आळंदी येथे जाऊन संत कृतज्ञता कार्यक्रमात सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आराध्यदैवत आहेत. त्यामुळे देशभरासह जगातही छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचं स्थान आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका कृतीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक वारशाचा आदर केला पाहिजे हे दाखवून दिलं आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवडमधील देवाची आळंदी येथे जाऊन संत कृतज्ञता कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी केलेल्या एका कृतीमुळे सर्वांचीच मने जिंकली आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या कृतीचे सगळीकडे कौतुक होत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही एक्स पोस्ट करत याबाबत भाष्य केलं आहे.

यावेळी संत, महात्म्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन आणि जिरेटोप देऊन सन्मान करण्यात आला. स्वामी गोविंद गिरी महाराज व तेथील संतांनी छत्रपती शिवाजी महारांज (Shivaji Maharaj) परिधान करत असलेल्यासम जिरेटोप देऊन डोक्यावर परिधान करण्याची विनंती मुख्यमंत्र्‍यांना केली. मात्र, छत्रपती शिवरायांचा जिरेटोप घालण्यास मुख्यमंत्र्‍यांनी नम्रपणे नकार दिला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. छत्रपती शिवरायांचा आदर ठेवत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिरेटोप डोक्यावर परिधान करण्यास नकार देत आपण शिवरायांचा मावळा असल्याचे म्हटले. विशेष म्हणजे जिरेटोप डोक्याला लावत फडणवीसांनी तो संतांकडे परत केला. मान्यवरांनी आग्रह केल्यानंतरही फडणवीसांनी विनंतीपूर्वक नकार दिला. तसेच, आपण छत्रपतींच्या मावळ्यासमान असल्याची प्रतिक्रिया देत जिरेटोप परिधान न करता त्याला नमन केल्याचं पाहायला मिळालं. सध्या आळंदीच्या समाधीस्थळ परिसरातील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून देवेंद्र फडणवीसांचे कौतूक होत आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवरही हा व्हिडीओ पोस्ट करत एक कॅप्शन दिली आहे. “जिरेटोपाचा मान शिवछत्रपतींचाच! रयतेच्या राज्याच्या निर्मितीसाठी या मावळ्याला महाराजांचा आशीर्वादच पुरेसा आहे,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश

“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss