गेल्या काही वर्षांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या पुरंदर विमानतळाच्या कामाला आता गती आली आहे. विमानतळासाठी लागणाऱ्या भूसंपादनाची जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे दिली असून सप्टेंबरपर्यंत सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. महाराष्ट्रातील सर्व विमानतळाच्या विमानसेवा आणि विकास कामासंदर्भात केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
मुरलीधर मोहोळ म्हणाले की, देशातील प्रत्येक नागरिक कोणत्या ना कोणत्या योजनेतून मोदी सरकारचा लाभार्थी आहे. आज स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांना प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्यात आले. ज्या व्यक्तीच्या घराचा कागद, जमिनीचा कागद स्वतःचा कधी झाला नव्हता त्यांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले त्यांना आता अधिकृत कागद मिळाला आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय दिला जात आहे.
पुढे ते म्हणाले की, “मागच्या आठवड्यामध्ये मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ३३ विमानतळाच्या बाबतीत बैठक झाली. त्या बैठकीत केंद्रातील व राज्यातील वरिष्ठ अधिकारी तिथे होते. पुरंदर विमानतळ २०२९ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. एमआयडीसी च्या माध्यमातून भूसंपादन केलं जाईल. पुण्याच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचे काम देखील पुढच्या वर्ष दीड वर्षांमध्ये पूर्ण होईल. पुरंदर, नवी मुंबई आणि पुणे या विमानतळाबाबत सकारात्मक बैठक झाली. महाराष्ट्रातील चार विमानतळाच्या नामांतराबाबतचे प्रस्ताव दिले आहेत. पुणे, छ.संभाजीनगर, नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटिलांचे नाव देण्यात यावे, कोल्हापूर विमानतळाला राजाराम महाराजांचे नाव द्यावे असे प्रस्ताव राज्य सरकारने पाठवले आहेत, मी पाठपुरावा करत आहेत.”
हे ही वाचा :
सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती