जालन्यात आंतरवली सराटे गावात आज मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. या लाठीचार्जचे व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओंमध्ये पोलिसांनी किती भीषण लाठीचार्ज केलाय ते स्पष्ट दिसत आहे. गावकऱ्यांनी दगडफेक केला. त्यामुळे लाठीमार आणि अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पण या घटनेमुळे मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाले. मराठा आंदोलकांनी धुळे-सोलापूर मार्गावर काही वाहनांची जाळपोळ केली. तसेच दगडफेक करण्यात आली. या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणासह अनेक मागण्यांसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे यांनी बेमुदत उपोषणाला सुरूृुवात केली आहे. मंगळवारपासून सुरू असलेले उपोषण अजूनही सुरू असून मुख्यमंत्र्यांनी आवाहन करूनही त्यांनी आपले उपोषण मागे घेतले नाही. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी परिसरातील आणि शेजारीत तीन जिल्ह्यांतील अनेक गावांनी कडकडीत बंद पाळला आहे. बेमुदत उपोषण स्थळी उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटील यांना घेण्यासाठी पोलिस आले असता मंडपातील नागरिक व पोलिसांचा मोठा राडा झाला.
या दरम्यान बाचाबाची होऊन या ठिकाणी दगडफेक, लाठी चार्ज झाला. गावातील आनेक नागरिक जखमी झाले, पोलिस देखील जखमी झाले आहेत. गावात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. तरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे करीता सुरू असलेल्या आमरण उपोषणाला शुक्रवारी तालुका १ रोजी गालबोट लागले. अप्पर पोलिस अधिक्षक राहुल खाडे, उप विभागीय अधिकारी दिपक पाटील यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांसोबत चर्चा केली यात तोडगा निघाला नाही. दरम्यान पोलिस व जमाव यांच्यामध्ये मोठा वाद होऊन हा प्रकार घडला.जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला आहे. हे आंदोलक गेल्या तीन दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत होते. त्यांची शुक्रवारी पोलिसांसोबत बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर अचानक लाठीमार सुरू केला. या घटनेमुळे या भागात मोठा तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, धुळे-सोलापूर महामार्गावर ३ गाड्या पेटवण्यात आल्या, तसेच १० ते १५ गाड्यांवर दगडफेक करण्यात आल्याचे समजते आहे. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाल्याचेही समजते आहे. पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि त्यानंतर जमाव पांगविण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आहे.
संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊन एकनाथ शिंदे म्हणाले , मी स्वत: उपोषण कर्त्याबरोबर बोललो होतो. मी अधिकाऱ्यांनाही बोललो होतो. पोलीस एस पी आणि कलेक्टरशी माझं बोलणं झालं. त्यांनी सांगितलं की मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करणं गरजेचं होतं. त्यांनी सांगितलं की, जरांगे पाटील यांना रुग्णालयात नेणं जरुरीचं होतं. त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न सुरु होता. पण त्यावेळी दगडफेकीची दुर्देवी घटना घडली. मराठा समाजाच्या आरक्षणावर सरकारची स्पष्ट भूमिका आहे. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळावं यासाठी न्यायालयीन लढाई सुरु आहे. उपसमितीची वारंवार बैठक घेत आहेत. यामधून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि कोर्टातही टिकायला पाहिजे यासाठी सरकार प्राध्यान्याने काम करत आहे. पण असं असताना दुर्देवी प्रकार समोर आला आहे. सरकार याची सखोल चौकशी करेल. यातून खरं वास्तव्य समोर येईल. दोषी ठरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. शांततेत आंदोलकांवर लाठीचार्ज करता कामा नये, अशी सरकारची भूमिका आहे. यावर सरकार योग्य ती उच्च स्तरीय चौकशी करेल. मराठा समजाला मी शांततेचं आवाहन करतो. शांतता प्रस्थापित करणं हे पहिलं काम केलं पाहिजे. लाठीचार्जवर चौकशी केली जाईल आणि दोषी आढळले तर कारवाई केली जाईल. मराठा आरक्षण हा उद्देश सर्वांचा आहे. अशाप्रकारच्या घडू नयेत यासाठी मराठा समन्वयकांनी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे. सरकार पूर्णपणे त्यांच्या बाजूने आहे. राज्य सरकारची जबाबदारी आहे. पण शरद पवार हे मोठे नेते आहेत. अशा घटनेवेळी शांतता प्रस्थापित करणारं आवाहन केलं पाहिजे. आणखी उद्रेक होईल, अशाप्रकारची भूमिका कुठल्याही नेत्याने घेऊ नये. असे देखल एकनाथ शिंदे म्हणाले.