बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली. या हत्याप्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून बीडचे राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात ६ अरपोपिंना अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी अद्याप फरार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर मोक्का कायदा लावण्यात आला आहे. वाल्मिक कराड याच्यावरच फक्त खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, वाल्मिक कराडलाही मोक्का लावून त्याच्यावर 302 कलमातंर्गत कारवाई करा, अशी मागणी विरोधक आणि देशमुख कुटुंबीय करत आहे.
सीआयडीकडून आज वाल्मिक कराडवर देखील मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलीय. आज केज न्यायालयात वाल्मिक कराडला हजर करण्यात आले. आज खंडणी प्रकरणात पोलीस कोठडी वाल्मिक कराडची संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यामुळे खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, मकोका अंतर्गत सीआयडी कोठडी मिळाल्यास जामीन मिळणे सोपी नाही आहे. मकोका अंतर्गत सीआयडी कोठडी मिळाल्यास वाल्मिकचा पाय आणखी खोलात जाईल.
केज न्यायालयाने १४ दिवसांची वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आता पुन्हा १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज बीड येथील तुरुंगात नेलं जाईल. येथेच वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवले जाईल. त्यानंतर, सीआयडीने अर्ज केल्यानुसार उद्या मकोका अंतर्गत ताब्यात घेऊन केज जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाईल. त्यामुळे, मकोका अंतर्गत न्यायालयात हजर केले असता, पुन्हा न्यायालयाकडून आरोपीला सीआयडी कोठडी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे खंडणी प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडच्या वकिलांकडून जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. मात्र, मकोकोअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने वाल्मिक कराडला जामीन मिळण्याची शक्यता कमी आहे.
संघटीत गुन्हेगारी म्हणजेच मकोका अंतर्गत वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झाल्याने न्यायालयाकडून त्यास पुन्हा सीआयडी कोठडी सुनावण्यात येईल. या सीआयडी तपासात मकोकासंदर्भाने तपास केला जाईल, ज्यामध्ये 302 अंतर्गत दाखल झालेल्या संतोष देशमुख प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. दरम्यान, यापूर्वी संतोष देशमुख प्रकरणातील 8 आरोपींविरुद्ध मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, वाल्मिक कराडवर अद्यापही खुनाचा गुन्हा दाखल नाही. दरम्यान, मकोकोअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने सत्र न्यायालयाकडून जामीन दिला जात नाही. मकोकाअंतर्गातील गुन्ह्यात विशेष न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज करावा लागतो. ते विशेष न्यायालय छत्रपती संभाजीनगर येथे आहे. त्यामुळे, मकोका अंतर्गत जामिनासाठी संभाजीनगरच्या कोर्टात अर्ज करावा लागणार आहे.
त्यामुळे मकोका लावण्याचा प्रश्नच येत नाही
खुनाच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडला आरोपी करण्यात आलेलं नाही, त्यामुळे मकोका लावण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे, आम्ही वाल्मिक कराडसंदर्भाने न्यायालयीने प्रक्रियेला समोरे जाऊ असं, वाल्मिक कराडचे वकील अॅड. सिद्धेश्वर ढोंबरे यांनी म्हटलंय. तर, खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीने कोठडी सुनावली आहे. त्यामुळे, जामिनासाठी अर्ज करता येणार आहे, त्यानुसार आम्ही जामीनासाठी अर्ज केला असून पुढील 2-3 दिवसांत जामीन अर्जावर सुनावणी होईल, असेही अॅड. ठोंबरे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.
हे ही वाचा:
अजितदादा….दोषींना शिक्षा देण्यात सरकार अपूर्ण पडले तर…काय म्हणाले Rohit Pawar?
Central Railway चा खोळंबा; उशिराने धावणाऱ्या लोकलमुळे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी