माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेच्या सोडतीची प्रक्रिया शहर व औद्योगिक विकास महामंडळ अर्थात सिडकोची २६ हजार घरे अंतिम टप्प्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. नवी मुंबईतील २६००० घरांच्या विक्रीसाठी सिडकोने माझे पसंतीचे सिडकोचे घर ही योजना आणलेली होती. या योजनेतून आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील व्यक्तींना तसेच लोअर इन्कम ग्रुप मधील लोकांना घरांची विक्री करण्यात येणार आहे. या योजनेतील घरांसाठी अर्ज करण्यास अनेकदा मुदतवाढ देण्यात आलेली. अखेर आता प्राधान्यक्रम नोंदवून बुकिंग शुल्क जमा करण्याची मुदत संपली आहे. त्यामुळं आता अर्जदारांची मसुदा यादी, अंतिम यादी आणि सोडत हे तीन टप्पे बाकी आहेत.
CIDCO ने जाहीर केलेल्या नवी मुंबईतील २६ हजार घरांच्या विक्रीसाठी माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेअंतर्गत सुरुवातीला २३६ रुपये भरुन अर्जाची नोंदणी करण्यास सांगण्यात आलं होतं. त्यामुळं सिडकोच्या वेबसाईटवर मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली होती. मात्र, त्यानंतर किंमती जाहीर झाल्यानंतर नोंदणी शुल्क भरणाऱ्यांची संख्या कमी असल्याचं समोर आलं होतं. यासाठी सिडकोनं सुरुवातीला घरांच्या किमती जाहीर केल्या नव्हत्या. त्यानंतर सिडकोनं पुन्हा मुदतवाढ दिली होती. नोंदणी शुल्क जमा केल्यानंतर सिडकोचे एकूण १५ प्राधान्यक्रम नोंदवल्यानंतर बुकिंग शुल्क जमा करण्यास सांगण्यात आलं होतं. त्याला देखील मुदतवाढ दिली गेली. बुकिंग शुल्क जमा करण्याची मुदत ३१ जानेवारीला संपली असून आता ३ फेब्रुवारीला अर्जदारांची मसुदा यादी (Draft list) जाहीर केली जाईल. यानंतर १० फेब्रुवारीला अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे.
सिडकोकडून २६००० घरांच्या Lottery साठी १५ फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. १५ फेब्रुवारीला सिडकोचं घर कुणाला मिळालं आहे, हे जाहीर करण्यात येईल. त्यानंतर सिडकोच्या घरासाठी पुढं काय करायचे हे सांगण्यात येईल.दरम्यान, सिडकोच्या घरांच्या किमती अधिक असल्यानं अर्जदारांनी त्यामध्ये कपात करण्याची मागणी केली होती. मात्र, सिडकोच्यावतीनं घरांच्या किमती कमी करण्यास नकार देण्यात आला होता.
खालीलप्रमणे सिडकोच्या घरांच्या किमती आकारण्यात आले आहेत.
गट EWS ( आर्थिक दुर्बल घटक )
तळोजा सेक्टर २८ – २५. १ लाख
तळोजा सेक्टर ३९ – २६. १ लाख
खारघर बस डेपो – ४८.३ लाख
बामणडोंगरी – ३१.९ लाख
खारकोपर २A, २B – ३८.६ लाख
कळंबोली बस डेपो – ४१.९ लाख
अल्प उत्पन्न गट (LIG) –
पनवेल बस टर्मिनस – ४५.१ लाख
खारघर बस टर्मिनस- ४८.३ लाख
तळोजा सेक्टर 37 – ३४.२ लाख ४६.४ लाख
मानसरोवर रेल्वे स्टेशन – ४१.९ लाख
खांदेश्वर रेल्वे स्टेशन -४६.७लाख
खारकोपर ईस्ट – ४०.३लाख
वाशी ट्रक टर्मिनल – ७४.१ लाख
खारघर स्टेशन सेक्टर वन A- ९७. २ लाख
हे ही वाचा :
Dandruff समस्येसाठी करा हा रामबाण उपाय
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा