धाराशिव मधून एक धक्कादाकयक घटना घडली आहे. पारधी समाजाच्या दोन गटात हाणामारी झाली आणि या हाणामारीत चौघांचा मृत्यू झाला. ही घटना मध्यरात्री घडली. शेतात पाणी देण्यावरून वाद झाला असं समोर आलं आहे. या घटनेनंतर येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हाणामारीत जीव जाईपर्यंत मारल्यामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे.
धाराशिवमधील वाशी तालुक्यातील बावी पेढवरील ही घटना घडली आहे. मध्यरात्री शेतात पाणी देण्याच्या वादातून दोन्ही गटात हाणामारी झाली. या हाणामारीत जीव जाईपर्यंत मारल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. यात ३ पुरुष आणि एका महिलेचा सहभाग आहे. पारधी समाजाच्या दोन गटात हि हाणामारी झाली आहे. ही घटना माहिती पडल्यास पोलिसांनी घटनास्तळी दाखल झाले. येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांना ताब्यात घेतलं आहे.
राज्यात सध्या हत्येच्या बातम्या समोर येत आहे. दिवसाढवळ्या हत्या करण्यात येत आहे, अत्याचार करून हत्या करण्यात येत आहे, तर वयक्तिक कारणावरून सुपारी देऊन अपहरण करून हत्या करण्यात येत आहे, अश्या नाईक घटना सतत आपल्याला दैनिक जीवनात ऐकायला येत आहे. आता धाराशिव जिह्ल्यातील बावी या गावात दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारीत ३ पुरुष तर एक महिलेचा जीव गेला. या घटनेने बावी वस्तीतील तणावाचे वातावरण आहे.
हे ही वाचा:
Bhau Torsekar थेट म्हणाले, Nikhil Wagle यांनी शिवसेना संपावी म्हणून पत्रकारिता केली…
Matoshree, Sanjay Raut, Uddhav Thackeray, Bhau Torsekar की… नेमकं कोण झालं बदनाम?
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.