Aaditya Thackeray and Gulabrao Patil: राज्य विधिमंडळाचा आजचा तिसरा दिवस असून सभागृहात आदित्य ठाकरे आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात मोठी खडाजंगी पहायला मिळाली. सभागृहात आदित्य ठाकरे चर्चा करत असताना, त्यांनी खोचक टीका करत म्हणाले, “मंत्र्यांनी सभागृहात अभ्यास करून यावा. एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल तर तो प्रश्न राखीव ठेवावा. मंत्र्याला सांगा अभ्यास करून उत्तर द्या. पण यामुळे मंत्र्यांना त्यांचं खातं कळालंय की नाही,” अशी टिप्पणी करत मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर रोख धरला.
प्रश्नउत्तरा दरम्यान मंत्री गुलाबराव पाटील आणि आदित्य ठाकरे यांच्यात तू-तू मैं-मैं पाहायला मिळाली. त्यातच आमदार रोहित पवार यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना दणकून टोला लगावला. गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारांनी आक्षेप घेत मंत्र्यांना खातं कळत नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. त्या टीकेला प्रत्युत्तर देत गुलाबराव पाटील यांनी खातं कळतं म्हणून तुमच्या बापाने मंत्री पद दिलं होतं, असा खोचक टोला लगावला.
नेमकं काय घडलं सभागृहात?
- आदित्य ठाकरे म्हणाले’ मंत्री नेहमी केंद्र सरकारकडे बोट ठेवतात, मग मंत्र्यांना खातं कळालं की नाही, हा प्रश्न आहे.
- गुलाबराव पाटील म्हणाले’ मला खातं कळतं म्हणून तर त्याच्या बापाने मला खातं दिलं होतं.
- आदित्य ठाकरे प्रत्युत्तर देत म्हणाले’ “म्हणून तर तुम्ही पळून गेले होते.”
मात्र, या प्रसंगाची विधिमंडळात चांगलीच चर्चा रंगली होती. गुलाबराव पाटील हे शिवसेनेत असताना उद्धव ठाकरे यांचा मुलगा असल्याने आदित्य ठाकरे यांचा आदेश गुलाबराव पाटील यांच्यासाठी शिरसावंद्य असायचा. त्यावेळी गुलाबराव पाटील यांच्यासारख्या नेत्यांच्या माना मातोश्रीवर झुकवल्या जायच्या. मात्र, आज शिंदे गटात गेल्यानंतर त्याच गुलाबराव पाटील यांनी सगळ्यांदेखत आदित्य ठाकरे यांचा बाप काढला.
आदित्य ठाकरे यांनी सरकार ओढले ताशेरे :
अबू आझमीवर कालपासून कारवाई करायला हवी होती. सोलापूरकर, कोरटकर यांच्यावर कारवाई केली पाहिजे होती. भाजपचं स्वत:चं राजकारण सुरु असतं. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा जे अपमान करत आहेत त्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहेत. अबू आझमीला भाजपने सांगितलं, औरंगजेबची प्रशंसा करायला. या सरकारमध्ये ताळमेळ नाही. खेकड्यासारखी खेचा-खेची सुरु आहे. अधिकाऱ्यांचे निलंबन कधी करणार? तुमचं अडतं तरी कुठे? टपोरी मंत्री असल्यासारखं गुलाबराव वागतात. उत्तरं देतांना मंत्री टपोरीसारखी उत्तरं देतात. आता जे काही सुरू आहे ते पाहून फडणवीस यांच्या इमेजची चिंता आम्हाला वाटतेय.
हे ही वाचा:
Skin Care: पिंपल्सच्या समस्येपासून सुटकारा; गुलाब पाण्यात मिसळा ‘या’ गोष्टी